मुंबई शहर कबड्डी असो.आणि मुंबई महानगर पालिकेच्या संयुक्त विद्यमाने दि.१ ते ४ मार्च या कालावधीत होणाऱ्या "मुंबई महापौर चषक" व्यावसायिक पुरुष व महिला गट कबड्डी स्पर्धेची गटवारी आज जाहीर करण्यात आली. महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या मान्यतेने ना.म.जोशी मार्ग येथील श्रमिक जिमखान्यात होणाऱ्या या स्पर्धेत १५व्यावसायिक पुरुष संघांनी, तर १२स्थानिक महिला संघांनी सहभाग घेतला आहे. पुरुष संघाची ५गटात, तर महिला संघाची ४गटात विभागणी करण्यात आली आहे. दोन्ही विभागात प्रत्येक गटात ३-३संघ असतील. सामने प्रथम साखळी व नंतर बाद पद्धतीने खेळविण्यात येतील.
पुरुषांत नाशिक आर्मी, एअर इंडिया, भारत पेट्रोलियम हे संघ विजेत्यापदाच्या शर्यतीत असतील. मुंबई बंदर, रायगड पोलीस हे संघ स्पर्धेत कधीही उलथापालथ घडवू शकतात.महिला गटात राजमाता जिजाऊ आणि शिवशक्तीला पर्याय दिसत नाही.या स्पर्धेचे उदघाटन शुक्रवार दि.१ मार्च रोजी सायंकाळी ठीक ६-३०वा. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर , उपमहापौर सौ.शुभांगी वरळीकर यांच्या उपस्थितीत होईल. जिल्हा कबड्डी असो.चे सचिव विश्वास मोरे यांनी ही गटवारी आज प्रसार माध्यमांसाठी जाहीर केली. ती खालील प्रमाणे.
पुरुष व्यावसायिक गट :-
१)अ गट :- १)महिंद्रा, २)मध्य रेल्वे, ३)बँक ऑफ इंडिया.
२)ब गट :-१)एअर इंडिया, २)मुंबई बंदर, ३)सेंट्रल बँक.
३)क गट :-१)भारत पेट्रोलियम, २)देना बँक, ३)मुंबई महानगर पालिका.
४)ड गट :-१)नाशिक आर्मी, २)मुंबई पोलीस, ३)युनियन बँक.
५)इ गट :- १)बी.ई.जी.-पुणे, २)जे. जे. हॉस्पीटल, ३)रायगड पोलीस.
महिला विभाग:-
१)अ गट :- १)महात्मा गांधी, २)सुवर्णयुग, ३)अमरहिंद मंडळ.
२)ब गट :- १)शिवशक्ती मंडळ, २) स्वराज्य क्लब, ३)होतकरू मंडळ.
३)क गट :- १)राजमाता जिजाऊ, २)मुंबई पोलीस जिमखाना, ३)शिवतेज स्पोर्ट्स.
४)ड गट :- १)संघर्ष स्पोर्ट्स, २)जय हनुमान बावची, ३)डॉ. शिरोडकर स्पोर्ट्स.