शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
4
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
5
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
6
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
7
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
8
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
9
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
10
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
11
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
12
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
14
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
15
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
16
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
17
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
18
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
19
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
20
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर

बीसीसीआयची वार्षिक सभा आज

By admin | Published: September 21, 2016 4:59 AM

सर्वोच्च न्यायालयातर्फे नियुक्त करण्यात आलेल्या लोढा समितीच्या शिफारशींच्या सावटाखाली बीसीसीआयची बुधवारी वार्षिक सभा होत आहे.

मुंबई : सर्वोच्च न्यायालयातर्फे नियुक्त करण्यात आलेल्या लोढा समितीच्या शिफारशींच्या सावटाखाली बीसीसीआयची बुधवारी वार्षिक सभा होत आहे. या बैठकीमध्ये मानद सचिवपदाच्या निवडणुकीच्या मुद्याचा समावेश आहे. बीसीसीआयचे सचिव अजय शिर्के यांनी याबाबत अधिकृत नोटीस ३१ आॅगस्ट रोजी पाठविली होती. नव्या मानद सचिवपदासाठी बोर्डाकडे अर्ज सादर करण्याचा आज, मंगळवारी दोन तासांचा अवधी देण्यात आला आहे. त्यानंतर अर्जाची छाननी होईल आणि लगेच पात्र उमदेवारांची यादी जाहीर करण्यात येईल. अनुराग ठाकूर यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर शिर्के यांना सचिवपदासाठी नामांकित करण्यात आले होते. त्यामुळे सचिवपदाची निवडणूक आवश्यक झाली आहे. शशांक मनोहर यांनी राजीनामा दिल्यानंतर ठाकूर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. बीसीसीआयने सर्व संलग्न संघटनांना पाठविलेल्या नोटीसनुसार मानद सचिवपदाची निवडणूक बीसीसीआयच्या सध्या अस्तित्वात असलेल्या नियमानुसार होणार असून, सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश पी. बी. सावंत निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळतील. तसेच, कार्यसमिती व स्थायी समिती, सिनिअर व ज्युनिअर निवड समिती यांची बीसीसीआयच्या सध्याच्या नियमांनुसार नियुक्तीचा समावेश आहे. लोढा समितीच्या शिफारशींमध्ये समित्यांचा आकार छोटा करण्याची सूचना करण्यात आली असून, सर्वोच्च न्यायालयाने त्याला मंजुरी दिली आहे. लोढा समितीने शिफारशी लागू करण्यासाठी निर्धारित वेळ दिलेली असून, बुधवारी होणाऱ्या सभेत २०१५-१६ या वर्षातील नियमित कार्यच होणे अपेक्षित आहे. बीसीसीआयची मान्यता नसलेल्या क्रिकेट असोसिएशन आॅफ बिहारचे सचिव आदित्य वर्मा यांनी यापूर्वीच लोढा समितीला विनंती केली आहे, की बैठकीचा अजेंडा बघितल्यानंतर बीसीसीआयवर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई करायला हवी. (वृत्तसंस्था) >बैठकीमध्ये ९ नोव्हेंबर २०१५ रोजी झालेल्या गेल्या वार्षिक आमसभेव्यतिरिक्त यंदा १९ फेब्रुवारी, २२ मे आणि ५ आॅगस्ट रोजी झालेल्या तीन विशेष आमसभेच्या इतिवृत्ताचे वाचन होणार आहे. बैठकीच्या अजेंडामध्ये सचिवाच्या अहवालाला स्वीकृती देणे, कोषाध्यक्षाचा रिपोर्ट आणि गेल्या आर्थिक वर्षातील आॅडिट खाते, २०१६-१७ चे वार्षिक बजेट आणि अन्य प्रकरणांवर चर्चा यांचा समावेश आहे.>शिर्के यांचा सचिवपदावर शिक्कामोर्तबबुधवारी होणाऱ्या ८७व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बीसीसीआयच्या आगामी सचिवपदी अजय शिर्के यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणे निश्चित आहे. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले, की सचिवपदासाठी शिर्के यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे. त्यांच्या सचिवपदाची औपचारिक घोषणा बुधवारी करण्यात येईल.