सानियाचे स्वप्न : दुहेरीत खेळण्याचा व लग्नाचा निर्णय महत्त्वाचाहैदराबाद : जागतिक महिला रँकिंगमध्ये नंबर वन बनलेली भारतीय टेनिस तारका सानिया मिर्झा हिने निवृत्तीआधी आणखी एक ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकायची इच्छा असल्याचे सांगितले. जागतिक क्रमवारीत नुकतीच नंबर वन खेळाडू बनलेल्या सानियाने मिश्र दुहेरीत तीन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. सानिया म्हणाली, ‘‘मला टेनिस खेळणे आवडते, तसेच सराव व कठोर मेहनतही मला पसंत आहे. मला स्पर्धा आवडते. जोपर्यंत खेळेल तोपर्यंत आपण खेळाचा आनंद घेणार आहोत आणि अधिक कामगिरी उंचावण्याची आपली इच्छा आहे. जर रॉजर फेडरर आजदेखील खेळत असेल तर सर्वांनी खेळायला हवे. निवृत्तीआधी मला आणखी ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकायच्या आहेत.’’फेड कपमध्ये भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवणारी सानिया रविवारी रात्री स्टुअर्टगार्टला रवाना होणार आहे. एका प्रश्नाच्या उत्तरात सानियाने मार्टिना हिंगीसच्या साथीने पुढेही खेळणार असल्याचे सांगितले. सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस या जोडीने या हंगामात तीन स्पर्धा जिंकल्या आहेत. (वृत्तसंस्था)सानियाने २0१0मध्ये लग्न करणे आणि फक्त दुहेरीतच खेळण्याचे घेतलेले दोन निर्णय महत्त्वाचे ठरल्याचे सांगितले. ती म्हणाली, ‘‘२0१0मध्ये कारकिर्द संपुष्टात आल्याचे आपल्याला वाटले. तेव्हा माझ्या मनगटाविषयी समस्या होती. त्या वेळेस टेनिस खेळणे शक्यच नव्हते. त्यामुळे एक निर्णय हा लग्न करण्याचा होता. दुसरा निर्णय मी घेतला तो दुहेरी खेळण्याचा. त्या वेळेस तो कठोर निर्णय होता.’’
निवृत्तीआधी अजून एक ग्रँडस्लॅम जिंकायचेय!
By admin | Published: April 18, 2015 1:41 AM