शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
2
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
3
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
4
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
5
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
7
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
9
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
10
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
11
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
12
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
13
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
14
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
15
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
17
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
18
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
19
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
20
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...

अनुष्कासोबतचा "तो" क्षण खूप स्पेशल- विराट

By admin | Published: June 13, 2017 9:44 AM

विराटने अनुष्काविषयी आणि तिच्याबरोबर घालवलेल्या वेळेविषयी दिलखुलास गप्पा मारल्या आहेत.

ऑनलाइन लोकमत

लंडन, दि. 13- टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली जसा त्याच्या अफलातून खेळीमुळे प्रसिद्ध आहे तसाच तो अनुष्कासोबतच्या रिलेशनशिपमुळेसुद्धा चर्चेत आहे. विराट आणि अनुष्का दोघंही कार्यक्रमांना, एअरपोर्टवर एकत्र दिसतात. अर्थातच त्यावेळी सगळ्यांच्या नरजा त्या दोघांवर असतात.. आता पुन्हा एकदा विराटने अनुष्कासोबतच्या काही स्पेशल गोष्टी सांगून सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. एका मुलाखती दरम्यान विराटने अनुष्काविषयी आणि तिच्याबरोबर घालवलेल्या वेळेविषयी दिलखुलास गप्पा मारल्या आहेत.      
 
"मैंने कभी सोचा नहीं था ये दिन आएगा… वो आया अँण्ड आय एबल टू शेअर विथ हर…" असे उद्गार टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने बॉलिवूड स्टार अनुष्का शर्मा हीच्या बद्दल काढले आहे. यां दोघांच्या लव्ह अफेअरविषयी आपण गेल्या काही वर्षांपासून ऐकतो आहे. पण दोघांनीही अजूनही आपल्या प्रेमाची कबुली दिलेली नाही. आयसीसीच्या एका मुलाखतीत विराट अनुष्काविषयी दिलखुलास बोलला आहे. विराटच्या या वाक्यातूनच दोघांमधलं स्वीट रिलेशन दिसून येतं आहे.
 
आजपर्यंत आपल्या रिलेशनबद्दल कुठेही न बोलणारा विराट अखेरीस अनुष्काबद्दलच्या नात्यावर बोलला. अनेक अडथळ्यांमधून विराट आणि अनुष्काचं नातं कसं घट्ट होत गेलं, हे स्टार स्पोर्टसच्या एका मुलाखतीत विराटने सांगितलं आहे. 
‘मेलबर्नमध्ये कसोटी मालिकेदरम्यान मला टीमचा कॅप्टन बनवल्याची घोषणा करण्यात आली, तेव्हा अनुष्का माझ्यासोबतच होती. तो क्षण माझ्यासाठी अतिशय खास होता’ असं सांगत विराटने अनुष्काचं खूप कौतुक केलं. यासंदर्भातील एक व्हिडिओ ‘स्टार स्पोर्टस’ने युट्यूबवर शेअर केला आहे. 52 सेकंदच्या या व्हिडीओमध्ये विराटने अनुष्कासोबतच्या खास क्षणांना उजाळा दिला. प्रत्येक चांगल्या-वाईट प्रसंगात अनुष्का सोबत होती आणि आहे. हे माझ्यासाठी नेहमीच ग्रेट फील देणारं आहे, असंही तो म्हणाला.
 
आजवर क्रिकेट आणि बॉलिवूडमध्ये अनेक जोड्या जमलेल्या आपण पाहिल्या आहेत. पण  विराट आणि अनुष्काने आपली मैत्री, प्रेम, वैयक्तिक आयुष्य वेगळ्या पातळीवर नेऊन ठेवलं, ज्यामुळे त्यांचं नातं आजपर्यंच अधिक घट्ट झालं आहे. 
स्टार स्पोर्ट्सने शेअर केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावरसुद्धा चांगलाच गाजतो आहे. तसंच हे दोघं आता कधी लग्न बंधनात अडकणार या विषयीची चर्चासुद्धा जास्त रंगायला लागली असेल. 
 
आणखी वाचा
 

जिंकण्यासाठी दुखवावे लागतेच : कोहली