शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

कुछ भी हो सकता है!

By admin | Published: April 12, 2017 3:30 AM

दुखापती किंवा विश्रांती यामुळे काही खेळाडूंच्या अनुपस्थितीनंतरही आयपीएलचे १०वे सत्र शानदारपणे सुरू झाले. त्यांच्या अनुपस्थितीचा क्रिकेटच्या ‘क्वालिटी’ तसेच

- अयाझ मेमन (संपादकीय सल्लागार)दुखापती किंवा विश्रांती यामुळे काही खेळाडूंच्या अनुपस्थितीनंतरही आयपीएलचे १०वे सत्र शानदारपणे सुरू झाले. त्यांच्या अनुपस्थितीचा क्रिकेटच्या ‘क्वालिटी’ तसेच चाहत्यांवर काही परिणाम झाला, असे मला वाटत नाही. पहिल्या सत्राची तुलना केल्यास आता परिस्थिती खूप बदलली आहे. एका दशकानंतर आयपीएल ज्या पद्धतीने पुढे वाटचाल करीत आहे, त्याला थांबवणे शक्य नाही. अनुभव हेच सांगतो, की मुख्य खेळाडूंचा खराब फॉर्म किंवा अनुपस्थिती ही नव्या चेहऱ्यांना संधी देणारी ठरली. अशा कुशाग्र खेळाडूंसाठी हे एक उत्तम व्यासपीठ ठरले. यातूनच काही खेळाडंूचा राष्ट्रीय संघाचा मार्गही मोकळा झालेला आहे.आयपीएलमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये छाप सोडणारे रवीचंद्रन आश्विन, रवींद्र जडेजा, स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर ही त्यांतील काही नावे. दुखापती ह्या खेळ आणि खेळाडूंसाठी काही नव्या नाहीत. त्या नेहमीच धोक्याच्या असतात. त्यामुळेच प्रत्येक संघाची तुकडी ही २७ खेळाडूंची करण्यात आली. हे सर्व काही केवळ बॅक-अप आणि बॅक-अपसाठीच.मुख्य खेळाडूही अनुपस्थित असला तरी त्याचा संघावर विशेष परिणाम होत नाही. निश्चितपणे, लिलावात फ्रेन्चायझी संघ निवड कशी हाताळते, यावरही ते अवलंबून असते, हे सुद्धा आव्हानच आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचेच उदाहरण घेऊया. याचा सर्वाधिक अनुभव त्यांना आलाय. के.एल. राहुल आणि मिशेल स्टार्क हे संपूर्ण स्पर्धेत तर विराट कोहली, ए. बी. डिव्हिलीयर्स यांना काही सामन्यांसाठी स्पर्धेला मुकावे लागत आहे. अशा खेळाडूंची अनुपस्थिती नुकसानकारक ठरू शकते. असे असतानाही त्यांचा संघ ख्रिस गेल, शेन वॉटसन, सॅम्युअल बद्री, क्रिस जॉर्डन, केदार जाधव, स्टुअर्ट बिन्नी, युजवेंद्र चहल, इकबाल अब्दुल्ला, सर्फराज खान, श्रीनाथ अरविंद यांच्यामुळे मजबूत आहे.‘स्टार’ नसलेतरी संघ कसा ठेवायचा, याचे नियोजन फ्रेन्चायझीने केले आहे. कागदावर हा संघ तगडा असला तरी त्यांना अजूनही चॅम्पियन होता आलेले नाही हे विशेष. जिंकण्यासाठी ‘स्ट्रॉँग टीम’ असणेच गरजेचे आहे, असेही नाही. पहिल्या सत्रात राजस्थान रॉयल्स हा सर्वांत कमकुवत संघ होता; पण त्यांनी चॅम्पियन होण्याचा मान मिळवलाय. त्यानंतर डेक्कन चार्जर्सजिंकला. पुढील वर्षी मात्र ते तळात होते. त्यामुळे क्रिकेटच्या या छोट्या फॉर्मेटमध्ये काय होईल, हे सांगता येत नाही. गेल्यावेळचा यंदाही विजेता होईल काय? असे विचारल्यास मी गप्प बसणेच योग्य समजेन. अभिनेता अनुपम खेर यांच्या स्टाईलमध्ये सांगायचे झाल्यास ‘कुछ भी हो सकता हैं!’