नवी दिल्ली - इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे १८ आॅगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत आयोजित १८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी ८०४ सदस्यांच्या भारतीय पथकास केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने अंतिम मंजुरी दिली. त्यात ५७२ खेळाडूंचा समावेश असून ३१२ पुरुष तसेच २६० महिला आहेत. सरकार ७५५ लोकांचा खर्च करणार असून २३२ पैकी ४९ अधिकाऱ्यांना मात्र स्वखर्चाने अथवा संबंधित महासंघाच्या खर्चाने जावे लागेल.भारतीय आॅलिम्पिक संघटनेने सोमवारी शिफारस केलेल्या सर्वच नावांना मंत्रालयाने मंजुरी प्रदान करताना ही अट टाकली आहे. सरकार ५७२ खेळाडू, १८३ अधिकारी, ११९ कोचेस, २१ डॉक्टर आणि फिजिओ तसेच अन्य ४३ अधिकाºयांचा खर्च करणार आहे. खेळाडू ३६ क्रीडा प्रकारात भाग घेतील. ज्या ४९ जणांचा सरकार खर्च करणार नाही त्यात २६ संघ व्यवस्थापक, तीन कोचेस आािण २० अन्य अधिकाºयांचा समावेश आहे.क्रीडा मंत्रालयाने आयओएच्या १२ जणांना प्रवास करण्यास मंजुरी दिली असून त्यात पथकप्रमुख, चार उपप्रमुख तसेच सात अन्य सदस्यांचा समावेश आहे. दुसरीकडे आयओएने मात्र आमच्या १२ सदस्यीय पथकाचा खर्च करण्यास आम्ही सक्षम असल्याने सरकारच्या मदतीची गरज नसल्याचे स्पष्ट केले. राजुकमार संचेती यांना उपपथकप्रमुख बनविल्यावरून वाद होताच आयओएने हा सावध पवित्रा घेतला आहे. क्रीडा मंत्रालयाने आयओएला लिहिलेल्या पत्रात ७५५ जणांचा खर्च सरकार करणार असून त्यात विमानप्रवास आणि व्हिसा खर्चाचाही समावेश आहे. अॅथलेटिक्स पथकातील ७ अधिकाºयांच्या खर्चास सरकारने नकार दिला. (वृत्तसंस्था)चार खासगी ट्रेनर खेळाडूंसोबत जाणार असले तरी त्यांना केवळ ‘पी’ कार्ड दिले जाईल. याचा अर्थ ते खेळाडूंच्या अथवा स्वत:च्या खर्चाने जातील. त्यात वेगवान धावपटू दूतीचंदचे कोच रमेशसिंग आणि ४०० मीटरचे कोच वसंतसिंग यांचा समावेश आहे. कुराश या खेळातील सहा अधिकाºयांना देखील पी गटात कार्ड देण्यात आले असून हॅन्डबॉलच्या दहापैकी पाच अधिकाºयांना स्वखर्चाने जावे लागेल.राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेप्रमाणे आशियाडसाठी कुठल्याही खेळाडूचे आईवडील अतिरिक्त अधिकारी म्हणून संघासोबत जाणार नाहीत. बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पीव्ही सिंधू यांचे फिजिओ मात्र पथकात सहभागी असून त्यांचा खर्च सरकार करेल. नेमबाज हीना सिद्धूचे पती आणि कोच रौनक पंडित तसेच जिम्नॅस्टिकपटू दीपा करमाकरचे कोच बिश्वेश्वर नंदी हे देखील सरकारी खर्चाने प्रवास करतील.५७२ खेळाडू आणि ११९ कोचेसना दरदिवशी ५० डॉलर पॉकेटमनी देण्यात येणार आहे. याशिवाय २१ डॉक्टर आणि फिजिओना दरदिवशी २५ डॉलर दिले जातील.
आशियाडसाठी ८०४ जणांच्या पथकाला मंजुरी, क्रीडा मंत्रालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 6:07 AM