deepika kumari silver medal : भारताची नामांकित तिरंदाज दीपिका कुमारीने विश्वचषकाच्या फायनलमध्ये रौप्य पदक जिंकले. अंतिम सामन्यात तिचा चीनच्या खेळाडूने पराभव केल्याने सुवर्ण पदक हुकले. विशेष बाब म्हणजे दिग्गज तिरंदाज दीपिका कुमारीने सहाव्यांदा तिरंदाजी वर्ल्ड कप फायनलमध्ये पदक जिंकण्यात यश मिळवले. दीपिकाला उपांत्य फेरीपर्यंत कोणत्याच अडचणीचा सामना करावा लागला नाही पण सुवर्ण पदकाच्या सामन्यात पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सांघिक स्पर्धेत रौप्य पदक जिंकणाऱ्या जियामनकडून तिला पराभव पत्करावा लागला. दीपिका नवव्यांदा वर्ल्ड कप फायनल खेळत होती. (deepika kumari archery)
२००७ मध्ये डोला बॅनर्जीने वर्ल्ड कप फायनलमध्ये भारतासाठी सुवर्ण पदक जिंकले होते. भारताची अव्वल रिकर्व्ह तिरंदाज दीपिका कुमारीने विश्वचषक फायनलमध्ये तिचे पाचवे रौप्य पदक जिंकले. दीपिका कुमारीने उपांत्यपूर्व फेरीत यांग झियाओलीचा ६-० असा पराभव केला आणि त्यानंतर अलेजांड्रा व्हॅलेन्सियाचा ६-४ असा पराभव केला. मात्र, अंतिम फेरीत भारतीय तिरंदाज ली जियामनकडून ६-० अशा फरकाने पराभूत झाली अन् ती सुवर्ण पदकापासून एक पाऊल दूर राहिली.
आपल्या लहानग्या लेकीला भारतात ठेवून गेलेली दीपिका चौथ्यांदा ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाली होती. पण, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. दीपिका २०२२ मध्ये एका मुलीची आई झाली. ती अद्याप ऑलिम्पिकमधील तिच्या पहिल्या पदकाच्या शोधात आहे.