नवी दिल्ली : अर्जेंटिनाच्या संघाने 2022च्या फिफा विश्वचषकावर आपले नाव कोरले आणि एकच जल्लोष केला. मात्र संघाचा गोलरक्षक एमिलियानो मार्टिनेझने विजयाचा आनंद साजरा करताना फ्रान्सच्या कालियन एमबाप्पेची खिल्ली उडवली. अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी ड्रेसिंग रूममध्ये फ्रान्सविरूद्धच्या विजयाचा आनंद साजरा केला. यावेळी अर्जेंटिनाचा गोलरक्षक मार्टिनेझ आपल्या सहकाऱ्यांसोबत आनंदोत्सव साजरा करताना फान्सचा स्टार एमबाप्पेची खिल्ली उडवताना दिसला. मार्टिनेझचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर बरीच टीका होत आहे.
दरम्यान, 2022 विश्वचषक फायनलमध्ये फ्रान्सला पराभूत केल्यानंतर अर्जेंटिनाचे खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये नाचत होते. यारम्यान सर्व खेळाडू मध्यभागी थांबतात आणि म्हणतात, "एक मिनिट शांतता… मग गोलरक्षक मार्टिनेझ ओरडतो 'एमबाप्पेसाठी', यानंतर खेळाडू पुन्हा एकदा जल्लोष सुरू करतात.
फ्रान्सच्या एमबाप्पेची उडवली खिल्लीकतारमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलरक्षक म्हणून मार्टिनेझला अंतिम सामन्यानंतर 'गोल्डन ग्लोव्हज' देण्यात आला. शूटआऊटच्या विजयात उत्कृष्ट पेनल्टी सेव्हर म्हणून त्याने शानदार कामगिरी केली. मात्र सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये अर्जेंटिनाचा संघ ड्रेसिंग रूममध्ये सेलिब्रेशन करत आहे. या व्हिडीओमध्ये मार्टिनेझने सर्वांना थांबवून एमबाप्पेचे नाव घेऊन खिल्ली उडवल्याचे पाहायला मिळत आहे.
एमबाप्पेने रचला इतिहास खरं तर फायनलच्या सामन्यात दोन पेनल्टी वाचवणाऱ्या अर्जेंटिनाच्या एमिलियानो मार्टिनेझला सर्वोत्कृष्ट गोलरक्षकाचा 'गोल्डन ग्लोव्हज' पुरस्कार देण्यात आला. मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओवरून त्याला टीकेला सामोरे जावे लागत आहे. जगभरातील चाहते त्याच्यावर टीका करत आहेत. 23 वर्षीय एमबाप्पेने हरल्यानंतरही आपल्या खेळाने लोकांची मने जिंकली आहेत. या स्पर्धेत सर्वाधिक गोल करण्याचा 'गोल्डन बूट' पुरस्कारही एमबाप्पेने पटकावला. लक्षणीय बाब म्हणजे फ्रान्सच्या एमबाप्पेने फायनलमध्ये गोलची हॅटट्रिक करून इतिहास रचला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"