FIFA विश्वचषक 2022 मध्ये लिओन मेस्सीचा संघ असलेल्या अर्जेंटिनाची जबरदस्त कामगिरी सुरू आहे. शुक्रवारी (9 डिसेंबर) रात्री उशिरा खेळल्या गेलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआऊटमध्ये नेदरलँड्सचा 4-3 अशा फरकाने पराभव केला. या विजयाबरोबरच आता अर्जेंटिनाने उपांत्य फेरीत धडक घेतली आहे. यानंतर, उपांत्य फेरीमध्ये त्यांचा सामना क्रोएशियाशीसोबत होईल.
परेडेसने केली भांडणाची सुरुवात -नेदरलँड आणि अर्जेंटिना यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान जबरदस्त राडा झाला. दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांना भिडले. हा संपूर्ण प्रकार खेळाच्या 88व्या मिनिटाला घडला. तेव्हा अर्जेंटिनाचा संघ 2-1 ने आघाडीवर होता. अर्जेंटिनाचा मिडफिल्डर लिएंड्रो परेडेसने नॅथन एकेला टॅकल केले (जमिनीवर पाडले). यानंतर, रेफ्रीने फाऊलची शिट्टी वाजवली. यामुळे संतप्त झालेल्या परेडसने नेदरलँड्सच्या डगआऊटमध्ये बॉलला कीक मारली.
...डच खेळाडूने दिला धक्का - यावर नेदरलँडच्या खेळाडूंनीही प्रतिक्रिया दिली. ते परेडेसचा सामना करण्यासाठी लगेच मैदानावर गोळा झाले. डिफेंडर व्हर्जिल वॅन डिज्क धावत आला आणि त्याने परेडेसला धक्का दिला. यानंतर इतरही डच खेळाडूंनीही आपला राग व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. यानंतर मॅच रेफरींनी दोन्ही संखाच्या खेळाडूनचे भांडण सोडवले आणि त्यांना दूर केले. एवढेच नाही, तर परेडेस आणि Berghuis यांना रेफरींनी येल्लो कार्ड देखील दाखवले, जेनेकरून खेळ पुढे सुरू राहावा.