शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

अर्जुन अवॉर्डी काका पवार यांनी घेतला आॅलिम्पियन मल्ल घडविण्याचा वसा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2017 9:38 PM

अनेक दिग्गज खेळाडू प्रतिष्ठा मिळाल्यानंतर त्या खेळाकडे पाठ फिरवितात. कुस्तीत महाराष्ट्र केसरी किताब मिळविला म्हणजे जग जिंकले, अशी आपल्या राज्यातील अनेक पहिलवानांची भावना. त्यामुळे कुस्तीकडे हे मल्ल सपशेल पाठ फिरवतात; परंतु मराठवाड्याचा सुपुत्र काका पवार मात्र या सर्वांपेक्षा अनोखा ठरला आहे.

 औरंगाबाद - अनेक दिग्गज खेळाडू प्रतिष्ठा मिळाल्यानंतर त्या खेळाकडे पाठ फिरवितात. कुस्तीत महाराष्ट्र केसरी किताब मिळविला म्हणजे जग जिंकले, अशी आपल्या राज्यातील अनेक पहिलवानांची भावना. त्यामुळे कुस्तीकडे हे मल्ल सपशेल पाठ फिरवतात; परंतु मराठवाड्याचा सुपुत्र काका पवार मात्र या सर्वांपेक्षा अनोखा ठरला आहे. मराठवाड्याचा असतानाही पुणे येथे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल उभारून अनेक आंतरराष्ट्रीय पहिलवान घडविणाºया काका पवार यांनी देशासाठी आॅलिम्पियन घडविण्याचा वसाच जणू घेतला आहे.काका पवार हे रुस्तुमे हिंद आणि प्रतिष्ठित असा ध्यानचंद पुरस्कारप्राप्त हरिश्चंद्र बिराजदार यांचे शिष्य. बिराजदार यांनी मराठवाड्यातील पहिला अर्जुन पुरस्कार विजेता व दोनदा शिवछत्रपती पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या काका पवार यांच्यासह राहुल आवारेसारखा प्रतिभावान पहिलवान देशाला दिला. गुरू हरिश्चंद्र बिराजदार यांचे काका पवार आणि राहुल आवारे हे महाराष्ट्राचे मल्ल आॅलिम्पिकमध्ये खेळावे हे स्वप्न; परंतु अनेक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत पदके जिंकल्यानंतरही त्या वेळेस जास्त पक्षपाती धोरणामुळे काका पवार यांनी पहिलवानकी सोडून प्रशिक्षकाची भूमिका अवलंबिली. त्यामुळे बिराजदार यांच्या सर्व आशा या राहुल आवारेवर होत्या; परंतु हे स्वप्न पूर्ण होण्याआधीच ते जग सोडून निघून गेले, याची खंत काका पवार यांच्या मनात खोलवर रुजली आहे. त्यामुळे आपल्या गुरूंचे स्वप्न पूर्ण करायचेच हा ध्यास आता काका पवार यांचा आहे. त्यामुळे राहुल आवारे आणि उत्कर्ष काळे यांना आॅलिम्पियन पहिलवान करायचेच असा निर्धार काकांचा आहे. त्यासाठी या दोघांकडूनही ते खूप मेहनत करून घेत आहेत. कुस्तीने प्रतिष्ठा दिली आणि समाजात ओळख निर्माण करून दिली. कुस्ती या खेळाचे आपणही काही देणे आहे, या भावनेने काका पवार यांनी आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल उभारण्याचा निश्चय केला आणि २००४ साली त्यासाठी पुणे येथे कात्रजजवळ जमीनही घेतली. त्यानंतर २६ हजार स्क्वेअर फूट जागेत प्रत्यक्ष आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाला आकार आला २००९ साली.संकुल उभारताना त्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले; परंतु काका पवार यांनी हे संकुल पूर्ण केले. या वेळेस अनेकांनीही त्यांना सढळ हाताने मदत केल्याचे स्वत: काका पवार सांगतात. महाराष्ट्रातील सर्वात मोठा ३0 बाय ३२ फूट आकाराचा लाल मातीचा आखाडा हे या आंतरराष्ट्रीय संकुल कुस्ती केंद्राचे वैशिष्ट्य. त्यामुळे पारंपरिक कला जपतानाच त्यावर सरावाने शक्तीचा अंदाज येतो आणि पकड मजबूत होते, असे काका पवार यांना वाटते. विद्यमान परिस्थितीत काका पवार यांच्याकडे मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील जवळपास १० वर्षांच्या या लहान वयोगटासह २७० पहिलवान मल्लविद्येचे प्रशिक्षण घेत आहेत. या सर्वच मल्लांना एकाच छताखाली म्हणजे कुस्ती केंद्रात राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सर्वच मल्ल स्वत:चा आहार स्वत:च करून घेत असतात. त्यामुळे या संकुलात स्वावलंबनाचे धडे देण्याचे कार्यही काका पवार करीत आहेत.विशेष म्हणजे या महागाईच्या काळातदेखील या कुस्ती केंद्रात मल्लांचे नाममात्र वार्षिक शुल्क असते. त्यात संकुलाचा दुरुस्ती खर्चही निघत नाही; परंतु काका याचा जास्त विचार करीत नाहीत. त्यांचे एकच स्वप्न आहे ते म्हणजे आॅलिम्पियन मल्ल घडविण्याचे. या कुस्ती संकुलात अत्याधुनिकतेलाही जास्त महत्त्व असून, मल्लांच्या कुस्ती खेळताना त्यांच्याकडून होणाºया चुका या व्हिडिओतून पाहून त्याचे विश्लेषण केले जाते व मल्लांच्या चुका सुधारण्यात येत आहेत. या संकुलात काका पवार यांच्यासह गोविंद पवार, भारतीय कुस्ती संघाचे माजी प्रशिक्षक रणधीरसिंग, सुनील लिमन, प्रकाश घोरपडे आणि शरद पवार हे मार्गदर्शन करीत असतात. सध्या काका पवार यांच्याकडे जागतिक आणि आशियाई स्पर्धेतील पदक विजेता राहुल आवारे, उत्कर्ष काळे यांच्यासह सौरभ इंगळे, गणेश जगताप, विकास जाधव, ज्ञानेश्वर गोचडे, किरण भगत, कौतुक ढापले, शिवराज राक्षे, अतुल पाटील, योगेश पवार आदी दर्जेदार पहिलवान सराव करीत आहेत. कमी वेळेतच काका पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या कुस्ती केंद्राने आतापर्यंत विविध वयोगटात २५ आंतरराष्ट्रीय पहिलवान देशाला दिले आहेत. सध्या हे कुस्ती केंद्र अद्ययावत होण्याच्या दृष्टीने स्टीम बाथ, सोनाबाथ, रिलॅक्सशनसाठी थंड पाण्याचा टब आदींचे जवळपास २५ लाख रुपयांचे काम या संकुलात सुरू आहे. हे कुस्ती केंद्र चालवणे हे मोठे आव्हानच आहे; परंतु हे आव्हान काका पवार दानशूर व्यक्तींच्या मदतीने यशस्वीपणे पेलत आहेत.

टॅग्स :Sportsक्रीडा