Arshad Nadeem Neeraj Chopra:पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीमने 2022च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. अर्शदने भारतीय स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राच्या एक पाऊल पुढे जात 90 मीटरपेक्षा जास्त लांब भाला फेकून सुवर्ण पदकावर नाव कोरले. नीरजला आतापर्यंत 89.94 मीटरपेक्षा जास्त लांब भालाफेक करता आला नाही.
अर्शद नदीमने दुखापतग्रस्त असतानाही 90.18 मीटर भालाफेक करून राष्ट्रकुलमध्ये सुवर्णपदक जिंकले. तर नीरजचे स्वप्न 90 मीटर भालाफेक करण्याचे आहे. मात्र नदीमने एका वक्तव्याने नीरजसमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे. नदीमने एका निवेदनात म्हटले की, तो राष्ट्रकुलमध्ये 95 मीटर भाला फेकण्याचा विचार करत होता, परंतु दुखापतीमुळे तेवढा लांब भाला फेकू शकला नाही.
नीरजला करावी लागेल तगडी तयारी विशेष म्हणजे, नदीमचे नवे लक्ष्य विश्वविक्रम मोडण्याचे आहे. भाला फेकण्यात जागतिक विक्रम जर्मनीच्या Jan ELEZNÝ च्या नावावर आहेय त्याने 25 मे 1996 रोजी 98.48 मीटर लांब भाला फेकला होता. नदीमने सांगितले की तो जागतिक विक्रम (98.48 मीटर) मोडण्यासाठी कठोर प्रशिक्षण घेईल. त्याच्या या घोषणेनंतर नीरज चोप्रासाठी टेन्शन वाढले आहे. आता नीरजला भविष्यात मोठ्या स्पर्धेत नदीमचे तगडे आव्हान मिळणार आहे.