लंडन : इंग्लंडचा कर्णधार अॅलेस्टर कुक आणि आॅस्ट्रेलियन कॅप्टन मायकल क्लार्क यांच्यासाठी बुधवारपासून कार्डीफ येथे सुरू होत असलेली अॅशेज मालिका खूप महत्त्वाची आहे. दोन्ही संघांचे कर्णधार कोणत्याही परिस्थितीत ही महत्त्वपूर्ण स्पर्धा जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावतील.इंग्लंडचा कर्णधार कुकसाठी अॅशेजमधील विजय गेल्या काही प्रतिकूल वर्षांच्या दृष्टीने आदर्श विजय ठरेल. त्यात २०१३-२०१४मध्ये मिळालेला ०-५ पराभव, पीटरसनचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाहेर जाणे आणि स्वत:चा फॉर्म या महत्त्वपूर्ण बाबी आहेत. त्याचप्रमाणे इंग्लंडमध्ये अॅशेज मालिकेतील विजय मिळविणे मायकल क्लार्कच्या कारकिर्दीसाठी महत्त्वपूर्ण उपलब्धी ठरेल. या स्टार फलंदाजाला इंगलंडमध्ये गेल्या तीन कसोटी मालिकांत पराभवाची चव चाखावी लागली होती.क्लार्कला कुकच्या तुलनेत जास्त आक्रमक कॅप्टन मानले जाते आणि आॅस्ट्रेलियाचा महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्न नेहमी त्याला चांगला कर्णधार मानतो. वॉर्न म्हणाला, ‘‘आम्ही स्लीपमध्ये सोबतीने उभे राहायचो आणि पूर्ण दिवस नेतृत्वाबाबत चर्चा करीत असायचो.’’ (वृत्तसंस्था)
दोन्ही संघांना अॅशेस मालिका महत्त्वाची
By admin | Published: July 07, 2015 12:53 AM