ऑनलाइन लोकमत
विशाखापट्टणम, दि. १४ : आर अश्विनच्या फिरकी गोलंदाजीच्या जाळ्यात लंकेचेचे फलंदाज अडकले, अश्विनने ४ तर रैनाने २ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. भारतीय फिरकी गोंलदाजीमुळे लंका सर्व बाद ८२ धावाचं करु शकली. तिसरा सामना जिंकून मालिकी विजय मिळवण्याच्या दिशेने भारतीय टी २० संघाने आगेकूच केल्याचे दिसते आहे.
तिसऱ्या व निर्णायक टी २० सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा निर्णय गोलंदाजानी सार्थ ठरवत लंकेच्या तगड्या फलंदाजीला खिंडार पाडले. श्रीलंका २० षटकेही खेळू शकली नाही. श्रीलंकेने १८ षटकात सर्वबाद ८२ धावा केल्या. त्यामुळे भारताला विजयासाठी ८३ धावांचे मोजकेच अव्हान मिळाले आहे. श्रीलंकेकडून दासुन सनाका (१९), निरोशन डिकवेला (२), दिलशान (१), कर्णधार चंडीमल (८), असेला गुणरत्ने (४), मिलिंदा सिरिवर्धना (४), सेकुगे प्रसन्ना (९), तिसारा परेरा (१२ ), सचित्र सेनानायके (८) धावांचे योगदान दिले.
पुण्यातील पराभवानंतर रांचीत दणकेबाज विजय मिळवून ताकद दाखवणारा भारतीय संघ श्रीलंकेविरुद्धच्या
तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारताचा फिरकी गोलंदाज आश्विनने श्रीलंकन फलंदाजांची दानादान उडवली. आश्विनने श्रीलंकेच्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात ओढताना लंकेचे चार फलंदाज माघारी परतवले. तर त्याला अनुभवी नेहराने उत्तम साथ दिली. अश्विन-नेहरा जोडीने पावर प्लेच्या पहिल्या सहा षटकात लंकेला धूळ चारली. पहिल्या सहा षटकातच लंकेचा अर्धा संघ तंबूत पाठवला गेला.
भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे लंकेचा अर्धा संघ पावरप्लेच्या ६ षटकात तंबूत परतला. अश्विनने आपल्या ४ षटकात ८ धावा देत ४ गडी बाद केले. रैनाने २ गड्याला बाद केले तर प्रत्येकी एका फलंदाजाला नेहरा, बुमरहा आणि जडेजाने तंबूचा रस्ता दाखवला. आर अश्विनने लंकेला आपल्या पहिल्या २ षटकात ३ धक्के देत श्रीलंकेच्या भक्कम फलंदाजीला खिंडार पाडले. अश्विनने आपल्या पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर निरोशन डिकवेला २ धावांवर आणि सहाव्या चेंडूवर धोकदायक दिलशानला १ धावांवर माघारी झाडले. तर आपल्या वैयकतिक दुसऱ्या आणि संघाच्या तिसऱ्या षटकात कर्णधार चंडिमलला ८ धावावर बाद केले. अश्विनने भेदक गोंलदाजी करत श्रीलंकेच्या भक्कम फलंदाजीला खिंडार पाडले.
पुण्यातील पहिल्या सामन्यात भारताला दारुण पराभव पत्करावा लागला होता. पण रांचीत परतफेड करीत ६९ धावांनी सामना जिंकून मालिका १-१ अशी बरोबरीत आणण्यात यश आले. पुण्याच्या गवताळ खेळपट्टीने भारतीय फलंदाजांचे अवसान गळाले. रांचीतील मंद खेळपट्टीवर मात्र भारतीय खेळाडूंना उत्तम ताळमेळ साधण्यात यश आले होते.
भारत :
महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, युवराजसिंग, रवींद्र जडेजा, रविचंद्रन आश्विन, जसप्रीत बुमराह, आशिष नेहरा, हार्दिक पंड्या.
श्रीलंका :
दिनेश चंडीमल (कर्णधार), दुष्मंता चामिरा, निरोशन डिकवेला, तिलकरत्ने दिलशान, दिलहारा फर्नांडो, असेला गुणरत्ने, तिसारा परेरा, सेकुगे प्रसन्ना, सचित्र सेनानायके, दासुन सनाका, मिलिंदा सिरिवर्धना.