ऑनलाइन लोकमतहैदराबाद, दि. 13 - भारतीय ऑफ स्पिनर रविचंद्रन आश्विनने आपला सहकारी भज्जी (हरभजन सिंग)च्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. बांगलादेश विरुद्धच्या एकमेव कसोटीत गोलंदाजी करताना अश्विनने पहिल्या डावत दोन आणि दुसऱ्या डावात चार बळी घेतले. कसोटीमध्ये पाच किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेण्याची अश्विनची ही 25 वेळ आहे. आश्विनने 45 कसोटी सामन्यांत हा पराक्रम करताना भज्जीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. 45 कसोटीत 84 डावात गोलंदाजी करताना अश्विनने हा पराक्रम केला आहे. सध्या संघाबाहेर असलेला भारतीय ऑफ स्पिनर भज्जीने 103 कसोटीत 190 डावात हा 25 वेळा पाच किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेतले आहेत. अश्विनने सामन्यांत सात वेळा १० किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेतले आहेत. त्याने चार शतके झळकावताना १८१६ धावा फटकावल्या आहेत. तर या मोसमात 63 बळी घेतले आहेत. काल अश्निनने सर्वांत कमी कसोटी सामन्यांत २५० बळी घेण्याचा विक्रम नोंदवला.आश्विनने ४५ कसोटी सामन्यांत हा पराक्रम करताना ऑस्ट्रेलियाचा महान वेगवान गोलंदाज डेनिस लिलीचा विक्रम मोडला. लिलीने ४८ कसोटी सामन्यांत हा पराक्रम केला होता. आश्विनने बांगलादेशच्या पहिल्या डावात २ बळी घेत या विक्रमाला गवसणी घातली. अश्विनने बांगलादेशचा कर्णधार मुशफिकूर रहिमची विकेट काढत कसोटी कारकीर्दीतील 250 बळींचा टप्पा ओलांडला होता त्यामुळे आज सामना संपल्यानंतर सामन्यातील त्या चेंडूवर मुशफिकूर रहिमची स्वाक्षरी घेतली आहे.
अश्विनने केली भज्जीच्या विक्रमाशी बरोबरी
By admin | Published: February 13, 2017 4:48 PM