ऑनलाइन लोकमतबंगळुरू, दि. 7 - बंगळुरू कसोटीच्या दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा कर्दनकाळ ठरलेल्या रविचंद्रन अश्विनने विक्रमांची अजून दोन शिखरे सर केली आहेत. अश्विनने आज घरच्या मैदानावर 200 बळींचा टप्पा ओलांडला. त्याबरोबरच तो मायदेशात सर्वात वेगाने 200 बळी पूर्ण करणारा गोलंदाज ठरला आहे. तसेच अश्विनने या लढतीदरम्यान आपल्या बळींची संख्या 269 वर नेत महान गोलंदाज बिशनसिंग बेदी यांना मागे टाकले. आज ऑस्ट्रेलियाने आव्हानाचा पाठलाग करण्यास सुरुवात केल्यावर अश्विनने कांगारुंना फिरकीच्या जाळ्यात ओढण्यास सुरुवात केली. दरम्यान, चहापानापूर्वी अश्विनने एका अप्रतिम चेंडूवर मिचेल स्टार्कचा त्रिफळा उडवत ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का दिला. त्याबरोबरच वेड हा अश्विनचा घरच्या मैदानावरील 200 वा बळी ठरला. सामन्याअखेर मायदेशातील खेळपट्ट्यांवरील अश्विनच्या खात्यातील बळींची संख्या 202वर पोहोचली आहे.
( आर अश्विनने तोडला कपिल देव यांचा रेकॉर्ड )47 वी कसोटी खेळत असलेल्या अश्विनने आज सहा बळी टिपत आपल्या बळींची संख्या 269 वर नेली. त्यादरम्यान त्याने सर्वाधिक कसोटी बळी टिपणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत बिशनसिंग बेदींना (266 बळी) मागे टाकले. आता केवळ झहीर खान (311), हरभजन सिंग (417), कपिलदेव (434) आणि अनिल कुंबळे (619) हे गोलंदाज अश्विनच्या पुढे आहेत.