ऑनलाइन लोकमत
विशाखापट्टणम, दि. १४ : अश्विनच्या भेदक गोलंदाजीमुळे लंकेचा अर्धा संघ पावर प्लेच्या ६ षटकात तंबूत परतला आहे. अश्विनने आपल्या ३ षटकात ५ धावा देत ४ गडी बाद केले. तर एका फलंदाजाला नेहराने तंबूचा रस्ता दाखवला. आर अश्विनने लंकेला आपल्या पहिल्या २ षटकात ३ धक्के देत श्रीलंकेच्या भक्कम फलंदाजीला खिंडार पाडले. अश्विनने आपल्या पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर निरोशन डिकवेला २ धावांवर आणि सहाव्या चेंडूवर धोकदायक दिलशानला १ धावांवर माघारी झाडले. तर आपल्या वैयकतिक दुसऱ्या आणि संघाच्या तिसऱ्या षटकात कर्णघार चंडिमलला ८ धावावर बाद केले. अश्विनने भेदक गोंलदाजी करत श्रीलंकेच्या भक्कम फलंदाजीला खिंडार पाडले.
शेवटचे वृत्त हाती आले तेंव्हा लंकेने ६ षटकात ५ गड्याच्या मोबदल्यात २९ धावा केल्या होत्या.
तिसऱ्या व निर्णायक टी २० सामन्यात कर्णधार धोणीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्णधाराचा हा निर्णय गोलंदाजानी सारत ठरवला. दुसऱ्या सामन्यात एकतर्फी विजय नोंदवित आत्मविश्वास बळावलेला भारतीय संघ आज तिसऱ्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात श्रीलंकेवर पुन्हा एकदा विजय मिळविण्यासह मालिका जिंकण्याच्या इराद्याने उतरलेला आहे. भारतीय संघात कोणताही बदल केला नाही तर श्रीलंकेच्या संघात एकमेव बदल केला आहे. अनुभवी दिलहरा फर्नांडोला संघात स्थान दिले आहे. भारताने जर हा सामना गमानला तर भारतास आपले ICC चे टी २० मधील प्रथम स्थानापासून हात धुवावे लागलील.
पुण्यातील पहिल्या सामन्यात भारताला दारुण पराभव पत्करावा लागला होता. पण रांचीत परतफेड करीत ६९ धावांनी सामना जिंकून मालिका १-१ अशी बरोबरीत आणण्यात यश आले. पुण्याच्या गवताळ खेळपट्टीने भारतीय फलंदाजांचे अवसान गळाले. रांचीतील मंद खेळपट्टीवर मात्र भारतीय खेळाडूंना उत्तम ताळमेळ साधण्यात यश आले होते.
भारत :
महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, युवराजसिंग, रवींद्र जडेजा, रविचंद्रन आश्विन, जसप्रीत बुमराह, आशिष नेहरा, हार्दिक पंड्या.
श्रीलंका :
दिनेश चंडीमल (कर्णधार), दुष्मंता चामिरा, निरोशन डिकवेला, तिलकरत्ने दिलशान, दिलहारा फर्नांडो, असेला गुणरत्ने, तिसारा परेरा, सेकुगे प्रसन्ना, सचित्र सेनानायके, दासुन सनाका, मिलिंदा सिरिवर्धना.