ऑनलाइन लोकमत
मिरपूर, दि. २४ - आशिया चषकाच्या सलामीच्या सामन्यात भारतीय फलंदाजानी खराब सुरवात केली, सामना सुरु झाल्या नंतर दुसऱ्या षटकात सलामीवीर शिखर धवन वैयक्तिक २ धावावर बाद झाला. सुरेश रैना १३ धावावर बाद झाला. तर संघाच्या २२ धावा असताना धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीला मशरफी मुर्तजाने ८ धावावर बाद केले. शेवटचे वृत्त हाती आले तेंव्हा सलामीवीर मुंबईकर रोहित शर्मा (१८) आणि डावखुरा फलंदाज युवराज (३) मैदानावर होते. ९ षटकानंतर भारताच्या ३ बाद ४८ धावा फलकावर लागल्या होत्या .
आशिया चषकाच्या सलामीच्या लढतीत बांगलादेशनं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं आहे. टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी फिट झाला असून, आजच्या सामन्यात तो सहभागी होणार आहे. मिरपूरच्या शेरे बांगला स्टेडियमवर हा सामना रंगला आहे . भारतात होणाऱ्या आगामी विश्व टी-२० स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आशिया कप स्पर्धा वन-डे ऐवजी टी-२० फॉर्मेटमध्ये खेळल्या जाणार आहेत .
प्रतिस्पर्धी संघ
भारत :-
महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, सुरेश रैना, युवराज सिंग, रवींद्र जडेजा, हार्दिक पंड्या, आशिष नेहरा, आर. आश्विन, जसप्रीत बुमराह
बांगलादेश :-
मशरफी मुर्तजा (कर्णधार), इमरुल कायेस, नुरुल हसन, सौम्या सरकार, नासिर हुसेन, शब्बीर रहमान, महमुदुल्ला रियाध, मुश्फिकर रहीम, शकीबुल हसन, अल अमीन हुसेन, तास्किन अहमद, मुस्ताफिजुर रहमान, अबू हीदर, मोहम्मद मिथून, अराफत सन्नी