ऑनलाइन लोकमत
मीरपूर, दि. ६ - साबिर रेहमान आणि मेहमुद्दला यांनी केलेल्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर बांगलादेश संघाने १५ षटकात ५ बाद १२० धांवाचा डोंगर उभा केला. आणि भारताला विजयासाठी १२१ धावांचे आव्हान दिले. साबिर रेहमान आणि मेहमुद्दला यांनी शेवटच्या ४ षटकात ५० धावा वसूल केल्या. साबिर रेहमानने २९ चेंडूत ३२ धांवाची संयमी फलंदाजी केली तर मेहमुद्दलाने १३ चेंडूत २ चौकार आणि २ षटकांराच्या मदतीने झटपट ३३ धावा केल्या.
सामन्याच्या सुरवातीला बांगलादेशी फलदाजांनी धडाकेबाज फंलदाजी केली पण मध्यंतरीच्या षटकात धावगती वाढवण्याच्या नादात फलंदाज बाद होत गेले. पण भारतीय गोलंदाजांना बांगलादेशी फलंदाजांना कमी धावात रोखण्यात अपयश आले. बांगलादेश संघाने १५ षटकात ५ गड्यांच्या मोबदल्यात १२० धावा केल्या.
भारताकडून रविंद्र जडेजाने सर्वाधिक २ फलंदाजांची शिकार केली. तर आर अश्विन, नेहरा, बुमराहने प्रत्येकी एक फंलदाज बाद केला. बांगलादेश संघाने आज पहिल्या षटकापासूनच नेहराच्या गोंलदाजीवर धांवाचा रतीब लावला होता. नेहरा आणि पांड्या यांच्या ३ षटकात अनुक्रमे ३३ आणि ३५ धावा वसूल केल्या. पांड्याच्या तिसऱ्या आणि संघाच्या १४व्या षटकात साबिर रेहमान आणि मेहमुद्दला यांनी २१ धांवाची लयलूट केली.
पावसाच्या व्यत्ययानंतर सुरु झालेल्या सामन्यात बांगादेशी फलंदाजांनी भारतीय गोंलदाजांची चांगलीच फजिती केली. सुरुवातीपासूनच भारतीय गोंलदाजीवर त्यांनी आक्रमन पुकारले होते.
पहिल्यांदा फलंदाजी करताना बांगलादेशने आक्रमक सुरूवात केली. सौम्या सरकारने आशिष नेहराच्या दुसऱ्या षटकात ३ चौकार ठोकून आपले इरादे स्पष्ट केले. परंतु नेहराने त्याच षटकातील शेवटच्या चेंडूवर पांड्याकरवी सरकारला झेलबाद करून बांगलादेशला पहिला झटका दिला. त्यानंतर बुमराहने तमीम इक्बालला तंबूत धाडले.
७ षटकानंतर बांगलादेशने २ बाद ४७ धावा केल्या होत्या. त्यानंतर शकिब अल हसनच्या रुपाने बांगलादेशला तिसरा धक्का बसला. त्याला आर. अश्विनने बाद केले. त्यानंतर जडेजाने एकाच षटकात दोन फलंदाज बाद करत बांगलादेशला अडचणीत टाकण्याचा प्रयत्न केला पण साबिर रेहमान आणि मेहमुद्दलानी तो हाणून पाडला. सौम्या सरकार १४, तमीम इक्बाल १३, शकिब अल हसन २१ धांवांचे योगदान दिले.