दरम्यान, मीरपूरच्या शेर-ए-बांग्ला स्टेडियमवर सायंकाळी ७ वाजता अंतिम सामनाला सुरवात होणार होती. परंतु धूळीकणांसहित आलेले वादळ आणि जोरदार पावसामुळे हा सामना वेळेवर सुरू झाला नाही. पावसाचा जोर एवढा प्रचंड होता की हा सामनाच रद्द होण्याची शक्यता दिसत होती. दरम्यान,सामन्यापूर्वी सरावासाठी मैदानावर उतरलेले दोन्ही संघाचे खेळाडू पाऊस सुरु झाल्यानंतर ड्रेसिंगरुमध्ये परतले. खेळपट्टीवर पुन्हा कव्हर घालण्यात आले आहे. मिरपूरमध्ये ढगाळ वातावरण होते. आशिया कप टी-२० स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच भारत आणि बांगलादेशमध्ये अंतिम सामन्याचा थरार रंगला आहे. या स्पर्धेत भारत आतापर्यंत अजिंक्य राहिला असून, बांगलादेशला साखळी फेरीत फक्त भारताकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. पण त्यांनी त्यांच्यापेक्षा बलाढय असणा-या पाकिस्तान आणि श्रीलंका या संघावर मात केल्यामुळे बांगलादेशला कमी लेखून चालणार आहे. अंतिम सामन्यापूर्वीच बांगलादेशी चाहत्यांनी धोनीच आक्षेपार्ह पोस्टर सोशल मिडियावर व्हायरला करुन आधीच वादाला सुरुवात केली आहे. यापूर्वीही एकदिवसीय मालिकेत भारताचा पराभव केल्यानंतर बांगलादेशी वर्तमानपत्राने असाच उद्दामपणा केला होता. त्यामुळे चाहत्यांमधली ही ठसन मैदानावरही दिसू शकते. भारतीय संघाला विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. - प्रतिस्पर्धी संघ - भारत : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, युवराजसिंग, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन आश्विन, आशिष नेहरा, जसप्रीत बुमराह, अजिंक्य रहाणे, हरभजनसिंग, पवन नेगी, भुवनेश्वर कुमार.बांगलादेश : मुशर्रफ मुर्तझा (कार्णधार), तामिम इक्बाल, सौम्या सरकार, शब्बीर रहमान, मुशफिकर रहीम, शाकीब अल हसन, महमुदुल्लाह रियाद, मोहम्मद मिथून, अराफात सन्नी, तस्कीन अहमद, अल अमीन हुसेन, नासिर हुसेन,अबू हैदर, नुरुर हसन, इमरुल कायेस.
आशिया चषकाची फायनल - नाणेफेक जिंकून भारताचा गोलंदाजी करण्याचा निर्णय
By admin | Published: March 06, 2016 7:48 PM
नाणेफेक जिंकून भारताने गोलंदाजी करण्याचा प्रथम निर्णय घेतला आहे. भारतीय संघात रविंद्र जडेजा, आर अश्विन आणि आशिष नेहराचे पुनरागमन झाले आहे
ऑनलाइन लोकमत
मीरपूर, दि. ६ - आशिया चषकाच्या अंतिम लढतीतील पावसाचे विघ्न टळले आहे. सामन्याला सुरवात झाली असुन नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला आहे. नाणेफेक जिंकून भारताने गोलंदाजी करण्याचा प्रथम निर्णय घेतला आहे. भारतीय संघात रविंद्र जडेजा, आर अश्विन आणि आशिष नेहराचे पुनरागमन झाले आहे. आशिया चषकाची अंतिम लढत १५ षटकाची होणार आहे. सामना स्थानिक वेळेनुसार ९.३० वाजता सुरु होणार आहे. तर भारतीय वेळेनुसार ९ वाजता सामन्यास सुरवात होणार आहे. मिरपूरच्या शेरे-ए-बांगला स्टेडियमवर अंतिम सामना होणार आहे. सहाव्यांदा विजेतेपद मिळविण्याच्या इराद्याने टीम इंडियाचे शिलेदार मैदानात उतरणार आहेत.