नवी दिल्ली : भारताने दहाव्या आशियाई एअरगन नेमबाजीच्या पहिल्याच दिवशी पाच पदकांची कमाई केली पण अनुभवी नेमबाज आणि आॅलिम्पिक कांस्य विजेता गगन नारंग याची झोळी मात्र रिकामीच राहिली. जपानच्या वाको शहरात स्पर्धा सुरू आहे.रवीकुमारने पुरुषांच्या दहा मीटर एअर रायफलचे वैयक्तिक कांस्य जिंकले. अर्जुन बबुताने याच प्रकारात ज्युनियर गटात रौप्य जिंकले. भारताने सांघिक स्पर्धेतही तीन रौप्य पदकांची कमाई केली. अन्य तीन स्पर्धा प्रकारात भारताच्या सात खेळाडूंंनी वैयक्तिक गटात अंतिम फेरी गाठली. २०२० च्या टोकियो आॅलिम्पिकमधील नेमबाजीचे आयोजन याच रेंजवर होणार आहे.पुरुषांच्या दहा मीटर एअर रायफलच्या पात्रता फेरीत दीपक कुमारने चौथे स्थान मिळविले. रवी सहाव्या व नारंग सातव्या स्थानी आला. पहिल्या तिन्ही स्थानांवर चीनचे खेळाडू होते. अंतिम फेरीत दीपक पाचव्या स्थानी घसरला. रवीने तिसरे स्थान पटकावत पहिलेच आंतरराष्टÑीय कांस्य जिंकले. नारंग चौथ्या स्थानावर राहिला. भारतीय त्रिकूटाला रौप्यावर समाधान मनावे लागले. चीनला सुवर्ण आणि जपानला कांस्य मिळाले. अर्जुनने ज्युनियर गटाचे रौप्य जिंकले. शिवाय अर्जुन, तेजस प्रसाद व सुनमूनसिंग ब्रार या त्रिकूटाने सांघिक रौप्य पटकावले.महिलांच्या दहा मीटर एअर रायफल प्रकारात अंजुम मोदगिल, मेघना सजनार या दुसºया आणि चौथ्या स्थानावर राहिल्या. पूजा घाटकर मात्र ११ व्या स्थानावर राहिल्याने स्पर्धेबाहेर पडली.
आशियाई एअरगन नेमबाजी, भारताला पाच पदके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2017 3:35 AM