तिरंदाजी क्षेत्रात तिरंग्याची शान वाढवणाऱ्या सातारच्या लेकीला सर्वोच्च पुरस्कार मिळाला आहे. मूळची सातारची असलेल्या अदिती स्वामी हिने मागील वर्षी जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताला सुवर्णपदक जिंकून दिले होते. लक्षणीय बाब म्हणजे १७ वर्षांची अदिती गोपीचंद स्वामी ही भारताची पहिली विश्वविजेती ठरली आहे. तसेच ज्योती सुरेखा वेन्नम, अदिती स्वामी आणि परनीत कौर यांनी जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतासाठी प्रथमच सुवर्ण पदक जिंकले. आशियाई आणि जागतिक चॅम्पियन तिरंदाज अदिती स्वामी हिला २०२३ मध्ये केलेल्या ऐतिहासिक कामगिरीनंतर वर्षातील सर्वोत्कृष्ट तिरंदाजीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
अदितीसह भारतीय कंपाऊंड प्रकाराचे प्रशिक्षक सर्जिओ पाग्नी यांना संघासह उत्कृष्ट कामगिरीसाठी वर्ष २०२३ चा सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक हा पुरस्कार मिळाला. वयाच्या नवव्या वर्षापासून अदितीने तिरंदाजीला सुरुवात केली. अदिती ही मूळची सातारची असून तिची आई आंबवडी या गावात ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहे, तर वडील पेशाने शिक्षक आहेत. तिला एक लहान भाऊ असून तो देखील आर्चरीमध्ये नशीब आजमावत आहे.
अदितीची गरूडझेपदरम्यान, १७ वर्षीय अदिती गोपीचंद स्वामी ही भारताची पहिली विश्वविजेती ठरली आहे. तिने मागील वर्षी महिलांच्या जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करून तिरंग्याची शान वाढवली. सांघिक आणि वैयक्तिक सुवर्ण जिंकून अदितीने तमाम भारतीयांच्या मनात जागा केली. अदिती ही मूळची सातारची असून तिची आई आंबवडी या गावात ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहे.
सातारच्या लेकीची सोनेरी कामगिरी २०२३ हे वर्ष अदितीसाठी खूप खास राहिले. याच वर्षी तिने ऐतिहासिक विजयासह सोनेरी कामगिरी केली. अदितीचे वडील पेशाने शिक्षक आहेत, तर आई सातारा जिल्ह्यातील आंबवडी या गावची ग्रामसेवक आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातील तरूणीचे हे यश अनेकांसाठी प्रेरणा आहे. तिचा भाऊ देखील बहिणीच्या पावलावर पाऊल टाकत तिरंदाजीचा सराव करत आहे. २०१६ मध्ये अर्थात ९ वर्षांची असताना अदितीने या क्षेत्रात पाऊल ठेवले अन् २०१९ पासून महाराष्ट्रासाठी पदक जिंकले. राज्यस्तरावर चमकल्यानंतर २०२१ पासून अदिती आजतागायत भारतासाठी पदकांची कमाई करत आहे.