पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेतील ऐतिहासिक कामगिरीनंतर पहिली मॅच खेळणाऱ्या भारतीय संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत विजयी सलामी दिली. यजमान चीनला त्यांच्या घरच्या मैदानात ३-० असे पराभूत करत हरमनप्रीत सिंग याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने अपेक्षेला साजेसा खेळ करून दाखवला.
३ क्वार्टरमध्ये ३ गोल, चीनला दिली नाही एकही संधी चीनच्या हुलुनबीर येथील स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात भारतीय संघाने सुरुवातीपासून आक्रमक खेळ दाखवला. १४ व्या मिनिटाला सुखजीतन भारताच्या गोलचं खातं उघडले. दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने आघाडी आणखी भक्कम केली. उत्तम सिंग याने यावेळी गोल केला. तिसऱ्या क्वार्टरमध्ये अभिषेकनं गोल डागला. चौथ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाला गोल डागता आला नाही. पण चीनलाही त्यांनी गोल डागू दिला नाही. भारतीय संघ या स्पर्धेचा गत चॅम्पियन आहे. ट्रॉफीचा बचाव करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, याचे संकेत संघाने पहिल्याच सामन्यात दिले आहेत.
पाकसह अन्य लढती अनिर्णित
भारत आणि चीन यांच्याशिवाय ओपनिंग डेला जपान आणि दक्षिण कोरियो यांच्यात लढत झाली. या दोन्ही संघातील सामना ५-५ असा अनिर्णित राहिला. दुसरीकडे पाकिस्तान आणि मलेशिया यांच्यातील लढतही २-२ अशी अनिर्णित राहिली.