जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धाः पंधरा दिवस जकार्ता येथे रंगलेल्या क्रीडा कुंभमेळ्याची रविवारी सांगता झाली. जितक्या जल्लोषात 18 व्या आशियाई स्पर्धेची सुरूवात झाली होती, त्याच उत्साहात या स्पर्धेचा निरोप समारंभ पार पडला. भारताने आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करताना आशियाई स्पर्धेत आपली ताकद वाढली असल्याचे दाखवून दिले. भारताने 15 सुवर्ण, 24 रौप्य आणि 30 कांस्य अशी एकून 69 पदकांची कमाई करताना आठवे स्थान पटकावले. महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपालने निरोप समारंभात भारतीय पथकाचे नेतृत्व केले. ध्वजधारकाचा मान तिला देण्यात आला होता.
पुढील आशियाई स्पर्धा 2022 मध्ये चीनमधील हँगझाऊ शहरात होणार आहे. 10 ते 25 सप्टेंबर असा या स्पर्धेचा कालावधी असणार आहे.