ठळक मुद्देपहिल्याच लढतीत बजरंगने 65 किलो वजनीगटात विजय मिळवत थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
जकार्ता : भारताचा मल्ल बजरंग पुनियाने 65 किलो वजनी गटामध्ये आशिया क्रीडा स्पर्धेत दमदार सुरुवात केली आहे. पहिल्याच लढतीत बजरंगने 65 किलो वजनीगटात विजय मिळवत थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
बजरंगने पहिल्याच लढतीत सुंदर खेळ केला. खेळातील तांत्रिक गोष्टी त्याने घोटवून घेतल्या होत्या आणि तेच या सामन्यात पाहायला मिळाले. आपल्या चतुर आणि आक्रमक खेळाने बजरंगने पहिल्या लढतीत विजय मिळवला. या विजयासह त्याला उपांत्यपूर्व लढतीचे दरवाजे खुले झाले आहेत.