जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धाः भालाफेकपटू नीरज चोप्राने भारताला ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून दिले. राष्ट्रकुल स्पर्धेपाठोपाठ आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा तो दुसरा भारतीय खेळाडू ठरला. तसेच आशियाई स्पर्धेतील भालाफेक प्रकारातील भारताचे हे पहिलेच सुवर्णपदक ठरले. त्यामुळे नीरजला स्वतःचाच अभिमान वाटत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील अनेकांनी नीरजच्या कामगिरीचे तौंडभरून कौतुक केले. पण, सोशल मीडियावर नीरजच्या बाबतीत दुसरीच गोष्ट अधिक व्हायरल होत आहे.
( Asian Games 2018: नीरज चोप्राने केली या दिग्गजाच्या विक्रमाशी बरोबरी )
सुवर्णपदक स्वीकारताना स्टेडियमवर वाजलेले भारताचे राष्ट्रगीत सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. पदक वितरण सोहळ्यात नीरज मध्यभागी उभा होता आणि भारताचा तिरंगा डौलाने फडकत होता. हे दृश्य पाहताना देशवासीय अधिक भावूक झाले होते. का होतोय हा व्हिडीओ व्हायरल... पाहा.