शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

Asian Games 2018: युवा खेळाडूंचे यश आणि शिस्त अनुभवायला मिळाली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2018 12:01 AM

जकार्ता आशियाई गेम्समध्ये ६९ पदकांसह भारताने आपली सर्वोत्तम कामगिरी केली. २०१० च्या ग्वांग्झू आशियाई स्पर्धेच्या तुलनेत पदकांची संख्या चारने अधिक आहे.

- अयाझ मेमन(संपादकीय सल्लागार)जकार्ता आशियाई गेम्समध्ये ६९ पदकांसह भारताने आपली सर्वोत्तम कामगिरी केली. २०१० च्या ग्वांग्झू आशियाई स्पर्धेच्या तुलनेत पदकांची संख्या चारने अधिक आहे. भारताने यंदा पटकावलेल्या पदकांची संख्या गेल्या सात दशकांमध्ये राष्ट्रीय पातळीवर खेळल्या गेलेल्या स्पर्धांमध्ये भारताच्या संथ प्रगतीची कल्पना देण्यास पुरेसे आहेत. यावेळी जिंकलेल्या ६९ पदकांमध्ये अर्धा डझन पदके (ब्रिज, वुशू, कुराश) आशियाडमध्ये नव्याने समावेश करण्यात आलेल्या खेळांमध्ये मिळवलेली आहेत.भारतीय पारंपरिक रुपाने संथ असलेल्या इव्हेंटमध्ये गेल्या दशकात प्रगती बघायला मिळाली. त्यामुळे अशा खेळाबाबत सखोल विचारमंथन झाल्याचे स्पष्ट होते. याचा अर्थ खेळाबाबत भारतीयांची मानसिकता बदलत आहे? किंवा खेळाला योग्य स्थान मिळत आहे? भारत आता क्रीडाशक्ती म्हणून उदयास येत आहे, असे संबोधताना अभिमान वाटतो, पण आशियाई स्पर्धेबाबत काही महत्त्वाच्या बाबींकडेही लक्ष द्यावे लागले. केवळ जिंकलेल्या पदकांच्या संख्येचा विचार न करता खेळाडूंची कामगिरी, मोठ्या संख्येने युवा खेळाडूंचे यश आणि शिस्त अनुभवायला मिळाली.जकार्तामध्ये भारतीय खेळाडूंनी ट्रॅक अँड फिल्डमध्ये छाप सोडली. भारताने या स्पर्धेत एकूण १९ पदके जिंकली. पदकांची ही झेप नक्कीच शानदार असून त्याकडे डोळेझाक करता येणार नाही. पदक विजेत्या अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय विक्रम किंवा आपल्या वैयक्तिक कामगिरीच्या तुलनेत सरस कामगिरी केली. अनेक अन्य खेळाडू थोड्या फरकाने पदकापासून वंचित राहिले, पण त्यांनी २०२० मध्ये टोकियोत होणाऱ्या आॅलिम्पिक खेळासाठी आपली क्षमता सिद्ध केली.ट्रॅक अँड फिल्ड बाबत दोन कारणांमुळे अधिक बोलायचे आहे. त्यापैकी एक म्हणजे त्यात खेळाडूंची सर्वोत्तम कामगिरी प्रतिबिंबित झाली. बॅडमिंटन व टेनिसपटूंच्या तुलनेत मैदानी खेळाडू चांगले धावपटू असतात. त्यांच्या अधिक शक्ती असते. दुसरे कारण म्हणजे ट्रॅक अँड फिल्ड स्पर्धेत अधिक पदके असतात.त्यासाठी चांगली तयारी केली जाते. त्यामुळे मैदानी स्पर्धेच्या जोरावर भारताला पदक तालिकेत पदकांच्या संख्येत आणखी वाढत करता येईल. ट्रॅक अ‍ॅण्ड फिल्डमध्ये भारताच्या यशाची तिसरी व कदाचित सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे, ही भविष्याची पूर्वसूचना ठरेल.भारताच्या कामगिरीचे अवलोकन करताना अनेक अविस्मरणीय क्षण आले. त्यातील सर्वांत संस्मरणीय बाब म्हणजे लाईट फ्लाय बॉक्सिंगमध्ये २२ वर्षीय अमितने आॅलिम्पिक चॅम्पियन हसनब्बाय दुस्मातोव्हविरुद्ध मिळवलेला विजय. नऊ मिनिटांच्या बाऊटमध्ये अमितने शानदार खेळ करीत सुवर्णपदक पटकावले. त्याचे लक्ष्य टोकियो आॅलिम्पिकमध्ये पोडियमवर स्थान मिळवण्याचे असेल.अमित आणि २३ वर्षीय नीरज चोपडा यांच्यासह अनेक नव्या स्टारचा उदय झाला आहेत. सौरभ चौधरी (नेमबाजी) केवळ १६ वर्षांचा आहे, हिमा दास (धावपटू) १८ वर्षांची आहे. दुती चंद (धावपटू) २३ वर्षांची आहे तर स्वप्ना बर्मन २० वर्षांची आहे. हे खेळाडू प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत येथे पोहोचले. दरम्यान, सर्वंच विश्व किंवा आॅलिम्पिक चॅम्पियन होऊ शकत नाही, पण या खेळाडूंनी आपली छाप सोडली हे मात्र नक्की.कबड्डी व हॉकी संघांची कामगिरी निराशाजनक ठरली. त्यात महिला हॉकीने चांगली कामगिरी करत २० वर्षांनंतर अंतिम फेरी गाठली. तिरंदाजी, कुस्ती व बॉक्सिंगमध्ये भारतीय पिछाडीवर राहिले. तरीही, एकूण स्पर्धेचा विचार करता भारतीय खेळाडूंच्या प्रदशाआमुळे आशा उंचावल्या आहेत.

टॅग्स :Asian Games 2018आशियाई क्रीडा स्पर्धा