शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

Asian Games 2018: भोकनाळ स्कल्सच्या अंतिम फेरीत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 5:30 AM

भारतीय नौकायनपटू दत्तू भोकनाळ १८ व्या आशियाई गेम्समध्ये नौकायन स्पर्धेत पुरुष एकेरी स्कल्समध्ये अंतिम फेरीत दाखल झाला.

पालेमबांग : भारतीय नौकायनपटू दत्तू भोकनाळ १८ व्या आशियाई गेम्समध्ये नौकायन स्पर्धेत पुरुष एकेरी स्कल्समध्ये अंतिम फेरीत दाखल झाला. त्याचसोबत पुरुष लाईटवेट फोर संघाने अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली. भोकनाळने पुरुष एकेरी स्कलच्या रेपेचेज फेरीत ७ मिनिट ४५.७१ सेकंदच्या वेळसह आपल्या हिटमध्ये अव्वल स्थान पटकावताना अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली. भोपाल सिंग, जगवीर सिंग, तेजस शिंदे आणि प्रणय नौकरकर यांचा समावेश असलेल्या पुरुष लाईटवेट फोर संघाने आपल्या हिटमध्ये दुसरे स्थान पटकावले. टीम रेपेचेज हिटमध्ये ६ मिनिट ५१.८८ सेकंद वेळेसह अंतिम फेरीत स्थान मिळवण्यात यशस्वी ठरली. फायनल २३ आॅगस्टला होईल.दीपिका १७ व्या स्थानीदहाव्या सेटमध्ये खराब शॉटमुळे दीपिका कुमारी वैयक्तिक रिकर्व्ह तिरंदाजी स्पर्धेत १७ व्या स्थानी राहिली, तर महिला संघ सातव्या स्थानी राहिला. दीपिकाने पहिल्या हाफमध्ये चमकदार कामगिरी करत आठवे स्थान पटकावले, पण दहाव्या सेटमध्ये खराब शॉटमुळे तिला अव्वल १० मध्ये स्थान मिळवता आले नाही. दीपिकाने १० व्या सेटमध्ये केवळ १९ गुण नोंदवले. त्याआधी, तिने सलग २८ ते ३० दरम्यान स्कोअर नोंदवला होता. दीपिकाने एकूण ६४९ गुण मिळवले. प्रमिला दाइमेरी ६४२ गुणांसह २१व्या व अंकिता भकद ६१७ गुणांसह ३६ व्या स्थानी राहिली. लक्ष्मीराणी मांझी ६६ तिरंदाजांमध्ये ४४ व्या स्थानी राहिली. भारतीय संघ १९०८ च्या स्कोअरसह सातव्या स्थानी राहिला. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Asian Games 2018आशियाई स्पर्धा