नवी दिल्ली : घरची परिस्थिती हलाखीची होती. पण गावात वर्षातून एक जत्रा नक्की भरायची. त्यासाठी हा पठ्या पैसे साठवायचा. कारण त्याला जत्रेत फुगे फोडायचे प्रचंड वेड होते. तो जत्रेत फुगे फोडायला गेला की बक्षिस नक्कीच जिंकणार, ही त्याच्या घरच्यांनाही खात्री होती. त्यानेही घरच्यांना कधीच निराश केले नाही. त्याची हीच गोष्ट घरच्यांना भावली आणि त्यामुळेच त्यांनी आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या सौरभ चौधरीची.
मेरटमधील कलिना गावात सौरभचा जन्म झाला. वयाच्या तेराव्या वर्षांपर्यंत सौरभ शेतीचं काम करत होता. शेतीत तो रमत असला तरी त्याच्यातले गुण प्रशिक्षकांनी हेरले. त्यानंतर तीन वर्षांतच त्याने ही गगन भरारी घेतली. पण सुवर्णपदक पटकावल्यावरही सौरभला आठवण आली ती आपल्या शेतीची.
हलाखीच्या परिस्थितही घरच्यांनी घेऊन दिली बंदूकसौरभचे वडिल शेतकरी होते. घरची परिस्थिती बेताचीच होती. पण घरच्यांनी सौरभला पूर्णपणे पाठिंबा द्यायचे ठरवले होते. त्यामुळे त्यांनी सौरभला बंदूक घेऊन देण्यासाठी पैसे जमवले आणि त्याला एक लाख 75 हजारांची बंदूक घेऊन दिली.