जकार्ता - चार वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कमबॅक करताना द्युती चंदने आशियाई स्पर्धेत भारताला महिलांच्या 100 मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकून दिले. 2014मध्ये द्युतीला प्रतिबंधक द्रव्याचे सेवन केल्याप्रकरणी चार वर्षांच्या बंदीला सामोरे जावे लागले होते. मात्र. त्याविरोधात तीने क्रीडा लवादाकडे दाद मागितली आणि तिचा विजय झाला. मात्र, बंदीच्या काळात द्युतीला कोणीही आधार दिला नाही.
द्युतीने 20 वर्षांनंतर भारताला आशियाई स्पर्धेत 100 मीटर शर्यतीत पदक जिंकून दिले आहे. यापूर्वी 1998 साली रचिता मिस्त्रीने कांस्यपदक जिंकले होते. 22 वर्षीय द्युतीचे हे पहिलेच आशियाई पदक आहे. ती म्हणाली, 2014 चे वर्ष माझ्या आयुष्यातील सर्वात खराब वर्ष होते. लोकं माझ्याबद्दल उलटसुलट चर्चा करत होते. आज त्याच मुलीने कमबॅक करताना देशाला पदक जिंकून दिले.