मुंबई - दीपिका पल्लीकल आणि जोश्ना चिनप्पा या भारताच्या अव्वल महिला स्क्वॉशपटूंना आशियाई स्पर्धेत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. महिला एकेरीच्या उपांत्य फेरीच्या लढतीत दीपिका व जोश्ना यांना पराभव पत्करावा लागल्याने त्यांना कांस्यपदकाची वेस ओलांडता आली नाही. आशियाई स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय महिला स्क्वॉशपटूंनी एकेरीत दोन पदक जिंकण्याचा पराक्रम केला.
दीपिकाचे आशियाई स्पर्धेतील हे दुसरे कांस्यपदक आहे. तिने 2014मध्येही कांस्यपदक जिंकले होते. जोश्नाचे हे एकेरीतील पहिलेच पदक ठरले. यापूर्वी तिने महिला सांघिक गटात एक कांस्य व एक रौप्यपदक जिंकले आहे. या दोन पदकांसह भारताने आशियाई स्पर्धेत स्क्वॉशमधील 10 ( 1 सुवर्ण, 2 रौप्य व 7 कांस्य) पदके नावावर केली आहेत.