जकार्ता: जपानचे यूया नायोजेशी, ताकयू हाशीमोतो, ताकूम सातो आणि केता इमामुरा हे बास्केटबॉलचे चार खेळाडू रेड लाईट परिसरात दिसल्यामुळे जपान आॅलिम्पिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीची बैठक घेऊन त्या चार खेळाडूंची संघातून हकालपट्टी करून मायदेशी पाठविण्याचा निर्णय घेतला. या खेळाडूंना जपानच्या एका वृत्तपत्राच्या पत्रकाराने पाहिल्यानंतर, त्याने हे वृत्त जपानच्या आॅलिम्पिक फेडरेशनला कळविले. या वेळी या चार खेळाडूंनी जपान संघाची जर्सी घातलेली होती. या खेळाडूंनी तेथील एका दलाला संपर्क केला होता. या दलालाला पैसे दिल्यानंतर, त्याने खेळाडूंबरोबर मुलींना हॉटेलमध्ये पाठविण्यास तयारी दर्शविली होती.या चारही खेळाडूंनी त्यांना जाण्याचा आदेश दिल्यानंतर, देशाचा अपमान झाल्याबद्दल माफी मागितली आहे. यासंदर्भात, आशियाई आॅलिम्पिक परिषदेचे अध्यक्ष शेख अहमद अल फहद अल-सबा यांनी सांगितले की, तुम्ही २४ तास देशाचे प्रतिनिधित्व करीत आहे, याची जाणीव राहू द्या. ही घटना इतर खेळाडूंकरिता एक चेतावणी असेल.
Asian Games 2018: रेड लाइट परिसरात दिसलेल्या जपानच्या खेळाडूंना घरचा रस्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 1:55 AM