ठळक मुद्देया खेळात अॅथलेटीक्सच्या सात प्रकारांचा समावेश असतो.
जकार्ता , आशियाई क्रीडा स्पर्धा : भारताने अॅथलेटीक्समधील हेप्टॉथ्लॉन प्रकारामध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे. भारताच्या स्वप्ना बर्मनने भारताला हे सुवर्णपदक जिंकवून दिले.
या खेळात अॅथलेटीक्सच्या सात प्रकारांचा समावेश असतो. यामध्ये 200 मी. आणि 800 मी. धावण्याची शर्यत होते. त्याचबरोबर 100 मी. अडथळ्याची शर्यत खेळवली जाते. त्यानंतर उंच उडी. लांब उडी, गोळाफेक आणि भालाफेक या प्रकारांचा समावेश असतो.