स्क्वॉशपटू दीपिका पल्लीकलचा दमदार विजय
भारताच्या महिला टेनिसपटू अंकिता रैनाची विजयी घोडदौड उपांत्य फेरीत संपुष्टात आली. तिला चीनच्या शुआई झांगकडून 4-6, 6-7 असा पराभव पत्करावा लागला. यामुळे अंकिताला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
#Tennis रोहन बोपण्णा आणि दिविज शरण यांची अंतिम फेरीत धडक. उपांत्य फेरीच्या लढतीत भारतीय जोडीने जपानच्या येसूगी के व शिमाबुकुरो एस जोडीचा 4-6, 6-3, 10-8 असा पराभव केला.
# Badminton अश्विनी पोनप्पा आणि सिक्की रेड्डी या महिला दुहेरी जोडीने पहिल्या फेरीत हाँगकाँगच्या एनजी व येऊंगवर 21-16, 21-15 असा विजय मिळवला.
#Tennis अंकिता रैनाची उपांत्य फेरीत धडक. महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत एडीस वाँग चाँगचा 6-4, 6-1 असा पराभव
# Archery अतनू दास उपांत्यपूर्व फेरीत. डेनीस गँकीनवर 7-3 असा विजय. दीपिका कुमारीचे आव्हान संपुष्टात. चायनीज तैपेईच्या लेई चिएन यिंगकडून 7-3 असा पराभव.
जकार्ता - आशियाई स्पर्धेत गुरूवारी रोइंगमध्ये भारताला अपयशाचे तोंड पाहावे लागले. पुरुष दुहेरीपाठोपाठ पुरुषां सांघिक गटात भारतीयांचे कांस्यपदक थोडक्यात हुकले. महाराष्ट्राच्या दत्तु भोकनळला सिंगल स्कल प्रकारात 8 मिनिटे 28.56 सेकंदासह सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले.#Rowing पुरुषांच्या डबल स्कलमध्ये ओम प्रकाश व सवर्ण सिंग या भारतीय जोडीला 6:50.91 सेकंदासह चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
#Rowing मलकित सिंग व गुरींदर सिंग यांना रोइंगच्या पुरुष सांघिक गटात 0.33 सेकंदाच्या फरकाने चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्यांनी 7 मिनिटे 10.86 सेकंदाची वेळ नोंदवली.
#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेने 50 मीटर बटलफ्लाय गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश करताना भारताच्या पदकाच्या आशा उंचावल्या आहेत.