जकार्ता- आशियाई स्पर्धेत महिला एकेरीत पदक जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय खेळाडूचा मान सायना नेहवालला. रविवारी तिने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत थायलंडच्या इंतानोन रॅटचानोकचा 21-18, 21-16 असा पराभव केला. उपांत्य फेरीतील प्रवेशाने तिने कांस्यपदक निश्चित झाले आहे. यापूर्वी सय्यद मोदी यांनी 1982 मध्ये पुरुष एकेरीतील कांस्यपदक नावावर केले होते. पी. व्ही. सिंधूनेही उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारताच्या द्युती चंदला १०० मीटर शर्यतीत रौप्यपदक. ११.३२ सेकंदाची नोंदवली वेळ
#Athletics पुरुषांच्या 10000 मीटर शर्यतीत गोविंदन लक्ष्मणन याने 29 मिनिटे 44.91 सेकंदाच्या वेळेसह कांस्यपदक जिंकले.
#Bridge भारतीय संघाने ब्रीज स्पर्धेत ( पत्त्यांचा खेळ) दोन कांस्यपदक निश्चित केली. भारताला मिश्र व पुरुष सांघिक गटात उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला.
#Athletic भारताच्या द्युती चंदने महिलांच्या 100 मीटर शर्यतीच्या उपांत्य फेरीत 11.43सेकंदाची वेळ नोंदवली. तिने या कामगिरीसह अंतिम फेरीत स्थान निश्चित केले.
#Archery भारताच्या पुरुष तिरंदाजांनी कम्पाऊंड गटाच्या सांघिक गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीच्या सामन्यात त्यांनी चायनीज तैपेईचे आव्हान 230-227 असे मोडून काढले. रजत चौहान, अमन सैनी आणि अभिषेक वर्मा यांचा भारतीय संघात समावेश आहे.
#Boxing महिलांच्या 51 किलो वजनी गटात भारताच्या सर्जुबाला देवीने 5-0 अशा फरकाने तजाकिस्तानच्या घाफोरोव्हा मदिनाचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
#Badminton पी. व्ही. सिंधूची उपांत्य फेरीत धडक. थायलंडच्या जिंदपोल निटचाओनचा 21-11, 16-21, 21-14 असा चुरशीच्या लढतीत पराभव केला. उपांत्य फेरीतील प्रवेशाने महिला एकेरीतील आणखी एक पदक निश्चित.
#Boxing भारताच्या मनोज कुमारला 69 किलो वजनी गटात कझाकिस्तानच्या अब्दुराखमानोव्हकडून 5-0 असा पराभव पत्करावा लागला.
#Archery भारताच्या महिला तिरंदाजांनी कम्पाऊंड सांघिक गटाच्या उपांत्य फेरीत चायनीज तैपेईच्या खेळाडूंना कडवी टक्कर दिली. ज्योती सुरेखा, मुस्कान किरार आणि मधुमिता कुमारी यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाने 225-222 अशा फरकाने विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. सुवर्णपदकाच्या लढतीत त्यांच्यासमोर दक्षिण कोरियाचे आव्हान असणार आहे.
#Badminton रविवारी तिने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत थायलंडच्या इंतानोन रॅटचानोकचा 21-18, 21-16 असा पराभव केला. उपांत्य फेरीतील प्रवेशाने तिने कांस्यपदक निश्चित झाले आहे. यापूर्वी सय्यद मोदी यांनी 1982 मध्ये पुरुष एकेरीतील कांस्यपदक नावावर केले होते.
आशियाई स्पर्धेत भारताच्या खात्यात घोडेस्वार फौआद मिर्झाने रौप्यपदक जिंकून दिले. त्याने 26.40 गुणांची कमाई करताना ही विक्रमी कामगिरी केली. 1982नंतर घोडेस्वाराने पटकावलेले हे पहिलेच पदक ठरले. सांघिक गटातही भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. भारतीय संघाने 121.30 गुण मिळवले. जपान व थायलंड यांनी अनुक्रमे सुवर्ण व कांस्यपदक जिंकले.