जकार्ता : एकिकडे आशियाई क्रीडा स्पर्धेचा ज्वर चढत आहे. खेळाडू पदक जिंकवून देशाची शान वाढवत आहेत. पण या स्पर्धेत एक डोपिंग खेळाडू सापडला आहे. त्यामुळे स्पर्धेतील क्रीडाग्रामामध्ये खळबळ उडाली आहे.
या स्पर्धेला सुरु होण्यापूर्वी वाडा या उत्तेजक द्रव्यविरोधी संघटनेने खेळाडूंच्या चाचण्या घेतल्या होत्या. या चाचणीमध्ये एक खेळाडू दोषी आढळला आहे. या चाचणीमध्ये त्या खेळाडूच्या शरीरामध्ये फुरोसेमीड हा पदार्थ आढळला आहे. वाडाच्या एस-५ सुचित हा अमली पदार्थ नोंदणीकृत आहे. या पदार्थाच्या सेवनाने वजन कमी होण्यास मदत होते.
तुर्कमेनिस्तानचा कुस्तीपटू नाझारोव रुसतेम आशियाई क्रीडा स्पर्धेत डोपिंग उल्लंघन करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. ५७ किलो वजनीगटामध्ये खेळाला उपउपांत्यपूर्वी फेरीपर्यंत रुसतेमने मजल मारली होती.