ठळक मुद्देचाहते जेव्हा एखाद्या खेळाडूला पाठिंबा देतात तेव्हा त्याची कामगिरी नेत्रदीपक अशीच होते.
जकार्ता : चाहते जेव्हा एखाद्या खेळाडूला पाठिंबा देतात तेव्हा त्याची कामगिरी नेत्रदीपक अशीच होते. जकार्ता येथे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बजरंग पुनियाच्या बाबतीत हीच गोष्ट पाहायला मिळाली.
बजरंगचा उपांत्य फेरीचा सामना सुरु होता. त्यावेळी तेथे भारताचे चाहते उपस्थित होते. त्यावेळी भारतीय चाहत्यांनी 'वंदे मातरम' हा नारा द्यायला सुरुवात केली. हा जयघोष सुरु होत असताना बजरंगची कामगिरी सुधारत गेली. त्यावेळी भारतीय प्रशिक्षकांनीही चाहत्यांना घोषणा जोरात देण्यासाठी सांगितले. चाहत्यांनीही जोरात जयघोष सुरु केला. त्यावेळीच बजरंगने बाजी मारली आणि अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला.