जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धाः चार वर्षांच्या बंदीनंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कमबॅक करणाऱ्या भारताच्या द्युती चंदने आशियाई स्पर्धेत पदकाचा धमाका उडवून दिला. तिने 100 व 200 मीटर शर्यतीत भारताला रौप्यपदक जिंकून दिले. पी. टी. उषा यांच्यानंतर एकाच आशियाई स्पर्धेत 100 व 200 मीटर शर्यतीत पदक जिंकण्याचा मान द्युतीने पटकावला. तिच्या या यशामागचं रहस्य प्रशिक्षक एन रमेश यांनी सांगितले.
द्युतीने 11.32 सेकंदाच्या विक्रमासह 100 मीटर शर्यतीत रौप्यपदक नावावर केले. 200 मीटर शर्यत पूर्ण करण्यासाठी तिने 23.20 सेकंदाची वेळ घेतली. उंचीने कमी असूनही द्युतीने केलेली कामगिरी अविस्मरणीय आहे. प्रशिक्षक रमेश यांनी सांगितले की,"द्युनी आपल्या कमी उंचीची उणीव पायातील वेगाने भरून काढली. तसेच स्पीड रब्बरच्या ट्रेनिंगचाही तिला फायला झाला.'' आोडिशाच्या द्युतीची उंची 5 फुट 3 इंच आहे. तिने 20 वर्षांनंतर भारताला 100 मीटर शर्यतीत पदक जिंकून दिले.