जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धाः भारताच्या धारुण अय्यासामीने आशियाई स्पर्धेत ४०० मीटर अडथळ्याच्या शर्यतीत रौप्यपदक जिंकले. या पदकानंतर तरी नोकरी मिळेल, अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली आहे. वडिलांच्या निधनानंतर आईने काबाडकष्ट करत एकटीने त्याला वाढवले आणि आता तिला विश्रांती मिळावी म्हणून धारुण नोकरीची आस लावून बसला आहे.
तामिळनाडूच्या तुरुपूर येथील धारुणला या पदकानंतर नोकरीची आस लागली आहे. धारुणने ४८.९६ सेकंदाची वेळ नोंदवून रौप्यपदक जिंकले. तो म्हणाल," मला फक्त शर्यत पूर्ण करून पदक जिंकायचे होते. त्यावेळी माझ्यासाठी इतर सर्व गोष्टी शूद्र होत्या. राष्ट्रीय विक्रम केल्याचाही आनंद आहे."