शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

 Asian Games 2018 : यंदा ‘टॉप फाइव्ह’चे लक्ष्य साधणार का?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 3:36 AM

दोन दिवसांनी इंडोनेशिया (जकार्ता) येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताने आपला ५७२ खेळाडूंचा संघ पाठविला आहे. यंदा भारतीय संघ एकूण ३६ क्रीडा प्रकारांमध्ये आपला सहभाग नोंदवेल.

मुंबई : दोन दिवसांनी इंडोनेशिया (जकार्ता) येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताने आपला ५७२ खेळाडूंचा संघ पाठविला आहे. यंदा भारतीय संघ एकूण ३६ क्रीडा प्रकारांमध्ये आपला सहभाग नोंदवेल. या आधी २०१४ मध्ये झालेल्या इंचियोन आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघामध्ये ५४१ खेळाडूंचा समावेश होता. आतापर्यंत आशियाई स्पर्धेच्या इतिहासात भारताने १३९ सुवर्ण पदकांसह एकूण ६१६ पदकांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे, यातील ८२ सुवर्ण पदक १९८६ साली झालेल्या सेऊल आशियाई स्पर्धेपर्यंत जिंकले आहेत. यानंतर, भारताला केवळ ५७ सुवर्ण पटकावण्यात यश आले आहे. सुरुवातीच्या १० आशियाई स्पर्धा सत्रांच्या तुलनेत नंतरच्या ७ सत्रांमध्ये भारताच्या सुवर्ण पदकांमध्ये १८ % कमतरता आली आहे. त्याच वेळी, या दरम्यान खेळाडूंच्या सुविधांमध्ये मात्र कमालीची वाढ झाली. शिवाय, १९८६ सालानंतर भारताला एकदाही अव्वल पाच देशांमध्ये स्थान मिळविता आले नाही. त्यामुळेच यंदा भारतीय संघ ‘टॉप फाइव्ह’ ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.गेल्या ४ आशियाई स्पर्धांवर नजर टाकल्यास दिसून येईल की, भारताने स्पर्धेसाठी पाठविलेल्या एकूण खेळाडूंच्या संख्येचा १०% एवढे पदके जिंकली आहेत. यानुसार, २००२ साली दक्षिण आफ्रिकेत (बुसान) झालेली स्पर्धा भारतासाठी अत्यंत निराशाजनक ठरली. त्या वेळी भारताने १० सुवर्ण पदकांसह एकूण ३५ पदके जिंकत पदक तालिकेत आठवे स्थान पटकावले होते. एकूण विचार करता, १९९० साली बीजिंगमध्ये भारताची कामगिरी अत्यंत खराब झाली होती. त्या वेळी भारतीय संघ पदकतालिकेत अकराव्या स्थानी राहिला होता आणि केवळ एक सुवर्ण पदकासह एकूण २३ पदक जिंकण्यात यशस्वी ठरलेला.दोहा येथे १५व्या आशियाई स्पर्धेत भारताने २४ वर्षांनंतर पदकांचे अर्धशतक झळकावले होते. तेव्हा भारताने ५५० खेळाडूंचा संघ पाठविला होता. एकूण पदकांच्या बाबतीत भारताने २०१० साली ग्वांगझू आशियाई स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करत, गुणतालिकेत सहावे स्थान पटकावले होते. तेव्हा भारताने १० सुवर्ण पदकांसह एकूण ६५ पदके जिंकली होती. याहून अधिक पदके भारताने कोणत्याही आशियाई स्पर्धेत जिंकली नाहीत. २०१४ साली इंचियोन स्पर्धेतही भारताने ११ सुवर्णांसह एकूण ५७ पदक पटकावली होती.जकार्ताला भारतीय संघ रवाना होण्यापूर्वी भारतीय आॅलिम्पिक संघटनेचे (आयओए) अध्यक्ष नरेंदर बत्रा यांनी यंदा भारत ६५-७० पदक जिंकण्यात यशस्वी होईल, अशी आशा व्यक्त केली. विशेष म्हणजे, आशिया स्पर्धेत सहभागी होणाºया सर्व देशांंमध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने चीननंतर भारताचा क्रमांक लागतो, परंतु असे असले, तरी स्पर्धेतील अव्वल पाच देशांमध्ये भारताचा क्रमांक येत नाही.यंदा भारतीय संघ मजबूत भासत असला, तरी मोठ्या प्रमाणात पदकांची लयलूट करण्याबाबत शंका व्यक्त होत आहे. या आधी झालेल्या इंचियोन स्पर्धेत भारताने अ‍ॅथलेटिक्स, नेमबाजी, टेनिस, कुस्ती, तिरंदाजी, कबड्डी आणि बॉक्सिंग या खेळांमध्ये ५७ पैकी ४३ पदक पटकावले होते.यंदा नेमबाजीत पदक पटकावण्याची भारताची शक्यता कमी मानली जाते. कारण या आधी ४४ स्पर्धा व्हायच्या व यंदा २० स्पर्धाच होतील. या आधी ज्या स्पर्धांमध्ये भारताने ७ पदके जिंकली होती, त्या स्पर्धा यंदा होणार नसल्याने भारतीय नेमबाजांपुढे अडचणी आहेत. याचमुळे स्टार नेमबाज जीतू राय, गगन नारंग, मेहुली घोष आणि शाहजर रिझवी यांचा भारतीय संघात समावेश नाही.

टॅग्स :Asian Games 2018एशियन गेम्स २०१८Sportsक्रीडा