Asian Games 2023 : भारताच्या पारुल चौधरीने आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये आज ५००० मीटर शर्यतीचे सुवर्णपदक जिंकले. पारुलने काल ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये रौप्यपदक जिंकले होते आणि आज तिने सुवर्ण इतिहास लिहिला. पारुलने शेवटच्या ३० मीटरमध्ये जबरदस्त पुनरागमन करताना १५ मिनिटे १४. ७६ सेकंदाची वेळ नोंदवून सुवर्णपदक नावावर केले. आज भालाफेकीत ऐतिहासिक कामगिरी पाहायला मिळाली. अनू राणीने ( Annu Rani) महिलांच्या भालाफेकीत सुवर्णपदक जिंकले. २०२२च्या राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या अनूने आज इतिहास लिहिला. ७२ वर्षांच्या स्पर्धा इतिहासात भालाफेकीत सुवर्ण जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. अनूने ६२.९२ मीटर लांब भालाफेकला.
Asian Games 2023 : ७२ वर्षांच्या स्पर्धा इतिहासात जे कुणालाच नाही जमले ते अनू राणीने करून दाखवले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2023 6:52 PM