आशियाई स्पर्धेत यंदा भारतीय नेमबाजांनी हांगझोऊ येथील स्टेडियमवर जन-गन-मन ऐकण्याची संधी जगभरातील भारतीयांना दिली. आशियाई स्पर्धेतील महिला सांघिक नेमबाजी २५ मीटर एअर पिस्टलमध्ये मनु भाकरने देशासाठी गोल्ड जिंकलं. मुनने साधलेल्या लक्ष्यामुळे भारतीयांची मान उंचावली असून जगभरात शान वाढलीय. या गोल्डन विजयासह आशियाई स्पर्धेतील भारताचं हे १६ व पदक ठरलंय.
भारताच्या नेमबाजांनी आजच्या दिवसाच्या सुरुवातीलाच रौप्य पदकावर नाव कोरलं. आशी चौकसे, मनिनी कौशिक आणि सिफत कौर सामरा यांनी महिलांच्या ५० मीटर राइफल ३ च्या सांघिक क्रीडा प्रकारात रौप्य पदक जिंकलं आहे. त्यानंतर, आता मनु भाकरने सुवर्णवेध घेत आणखी एक गोल्ड मेडल भारताच्या नावावर केलंय. मनु भाकर, रिदम सांगवान आणि ईशा सिंह यांच्या टीमने २५ मीटर सांघिक प्रकारात १७२९ चा स्कोर करत गोल्ड मेडल जिंकले. या स्पर्धेत चीन १७२७ च्या स्कोरसह साथ दुसऱ्या स्थानावर राहिला असून कोरियाने १७१२ स्कोरसह कास्य पदक पटकावलं आहे.
दरम्यान, भारताने पहिल्या तीन दिवसांत गोल्ड मेडलसह १५ पदकं जिंकले आहेत. त्यात, आणखी एका पदकाची भर पडली असून भारताने आत्तापर्यंत १६ पदकांची कमाई केलीय. त्यात, नेमबाजीतील हे सातवे पदक आहे.