Asian Games 2023 : आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये तेजस्वीन शंकरने ( Tejaswin Shankar ) पुरुषांच्या डेकॅथलॉन स्पर्धेत ७६६६ गुणांसह राष्ट्रीय विक्रमाची नोंद करून रौप्यपदक जिंकले. याआधी त्याने १५०० मीटरच्या अंतिम फेरीत चौथे स्थान पटकावले होते. १९७४ नंतर आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या डेकॅथलॉन स्पर्धेत भारताचे हे पहिले पदक आहे. १९७४ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत विजयसिंह चौहान याने पदक जिंकले होते. यापूर्वीचा राष्ट्रीय विक्रम भारतिंदर सिंगच्या नावावर ७६५८ गुणांचा होता.
तेजस्वीनने १५०० मीटर शर्यत ४ मिनिटे ४७.५५ सेकंदात पूर्ण केली आणि त्याच्या खात्यात ६३४ गुण जमा करून रौप्यपदक निश्चित केले. त्याने जपानच्या यामू मारूयामाला मागे टाकले. चिनच्या सून क्यूहाओने ७८१६ गुणांसह सुवर्णपदक जिंकले. तेजस्वीनने तीन क्रीडा प्रकारात सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीची नोंद केली. त्याने ३९.२८ मीटर लांब थाळी फेकली, १३.३९ मीटर लांब गोळा फेकला आणि ४.१० मीटर बांबू उडी मारली.
डेकॅथलॉन मध्ये भारताला पदक जिंकून देणारे खेळाडू१९५१ - खुर्शीद अहमद ( कांस्य)१९५४ - रॉनी ओ'ब्रायन ( कांस्य)१९६२ - गुरबचन सिंग रंधावा ( सुवर्ण)१९७० - एम जी शेट्टी ( रौप्य)१९७४- विजय सिंग चौहान ( सुवर्ण)१९७४- सुरेश बाबू ( कांस्य)