Asian Games 2023 Neeraj Chopra : भारतीय खेळाडूंनी आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये विक्रमी पदकांची कमाई केली. भारताने आतापर्यंत ७६ पदकं जिंकली आणि ही आशियाई स्पर्धेतील भारताची आतापर्यंतची सर्वाधिक पदकं ठरली. त्यापैकी सर्वाधिक २६ पदकं ही ॲथलेटिक्समध्ये मिळवलेली आहेत. नीरज चोप्राच्या ( Neeraj Chopra)च्या कामगिरीकडे आज सर्वांच्या नजरा होत्या आणि त्याने ८८.८८ मीटर लांब ( सर्वोत्तम कामगिरी) भालाफेकून सुवर्णपदक निश्चित केले. भारताच्या किशोर कुमार जेनाने ८७.५४ मीटरसह रौप्यपदकावर नाव कोरले. महिलांच्या ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीत भारताने ३ मिनिटे २७.८५ सेकंदासह रौप्यपदक जिंकले.
किशोरने पहिल्या प्रयत्नात ८१.७६ मीटर लांब भालाफेकून दुसरे स्थान पटकावले, परंतु त्याच्या दुसऱ्या प्रयत्नात गोंधळ उडालेला पाहायला मिळला. तेव्हा त्याच्यासाठी नीरज पुढे आला. नीरजने दुसऱ्या प्रयत्नात ८४.४९ मीटर लांब भालाफेकून अव्वल स्थान कायम ठेवले. पण, किशोरने त्याच्या तिसऱ्या प्रयत्नात ८६.७७ मीटर ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक भालाफेक करून अव्वल स्थानी झेप घेतली. या कामगिरीसह किशोरने पॅरीस ऑलिम्पिक २०२४ चेही तिकिट पक्के केले. नीरजने त्याच्या चौथ्या प्रयत्नात ८८.८८ मीटर लांब भाला फेक करून पुन्हा अव्वल स्थान पटकावले. किशोरने ८७.५४ मीटर लांब भालाफेकून दुसऱ्या स्थानावरील पकड मजबूत केली.
नीरज चोप्राची कामगिरीसुवर्ण २०२० टोक्यो ऑलिम्पिक२०२३ जागतिक अजिंक्यपद स्पर्धा२०२२ डायमंड लीग२०१८ आशियाई स्पर्धा२०१८ राष्ट्रकुल स्पर्धा२०१७ आशियाई अजिंक्यपद स्पर्धा
रौप्य २०२२ जागितक अजिंक्यपद स्पर्धा२०२३ डायमंड लीग