Asian Games 2023 : भारताच्या पारुल चौधरीने आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये आज ५००० मीटर शर्यतीचे सुवर्णपदक जिंकले. पारुलने काल ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये रौप्यपदक जिंकले होते आणि आज तिने सुवर्ण इतिहास लिहिला. पारुलने शेवटच्या ३० मीटरमध्ये जबरदस्त पुनरागमन करताना १५ मिनिटे १४. ७६ सेकंदाची वेळ नोंदवून सुवर्णपदक नावावर केले. अॅथलेटिक्समध्ये आज महिलांच्या ३००० मीटर स्टीपलचेस प्रकारात पारुल चौधरीने रौप्य आणि प्रिती लांबाने कांस्यपदक जिंकून भारताच्या पदकात भर घातली. पारूलने ९ मिनिटे २७.६३ सेकंदाची वैयक्तिक सर्वोत्तम वेळ आज नोंदवली, तर प्रिती ९ मिनिटे ४३.३२ सेकंदासह तिसरी आली. प्रितीनेही सर्वोत्तम वेळेची नोंद केली होती. मेरठची चॅम्पियन मुलगी पारुल चौधरीची कहाणी खूप प्रेरणादायी आहे. पारुल चौधरी ही शेतकऱ्याची मुलगी एकेकाळी तिच्या गावातून स्टेडियमपर्यंत पायी जात असे. ८ वर्षांपूर्वी पारुलने जो ध्यास विकसित केला होता त्यामुळेच आज ती देशातील प्रथम क्रमांकाची धावपटू बनली आहे. या चॅम्पियन मुलीने आतापर्यंत इतकी पदके जिंकली आहेत की संपूर्ण खोली पदकांनी भरून गेली आहे.
पीटी उषाचा ३९ वर्षांपूर्वीचा राष्ट्रीय विक्रम मोडणाऱ्या विथ्या रामराजने ४०० मीटर हर्डलमध्ये आज ५५.६८ सेकंदाची वेळ नोंदवरून कांस्यपद नावावर केले.