Asian Games 2023 : भारतीय खेळाडूंनी आशियाई स्पर्धा २०२३ चा तिसरा दिवसही गाजवला. नेमबाजीत दोन सुवर्णपदक भारताने जिंकली. भारताच्या एकूण पदकांची संख्या ही २२ झाली असून त्यात ५ सुवर्ण, ७ रौप्य व १० कांस्यपदकं आहेत. आज रोशिबिना देवीने ( Roshibina Devi ) भारताच्या पदकाचे खाते उघडले. वूशू ( Wushu) मध्ये ६० किलो वजनी गटात रोशिबिनाने रौप्यपदक जिंकले. पण, तिच्या या कामगिरीला दाद मिळायला हवी. मणिपूरची रोशिबिना रोज आपल्या आई-वडिलांच्या चिंतेने हैराण असते.... मणिपूर जळतंय... आपले आई-वडील सुरक्षित आहेत का, ही चिंता तिला सतावते. याही परिस्थितीत ती लढल अन् देशासाठी रौप्यपदक जिंकले.
बॅडमिंटन - महिला सांघिक गटात भारताने ३-० अशी मंगोलियाविरुद्ध आघाडी घेतली आहे. पी व्ही सिंधूने पहिली मॅच २१-२,२१-३ अशी जिंकली. त्यानंतर अस्मिता चलिहा व अनुपमा उपाध्याय यांनी विजय मिळवला.