आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आत्तापर्यंत कौतुकास्पद कामगिरी बजावली असून ६९ पदकांची कमाई केली आहे. त्यामध्ये, १५ सुवर्णपदकावर भारताचं नाव कोरलं आहे. भारतीय खेळाडूंनी देशासाठी २६ सिल्व्हर व २६ कास्य पदके जिंकली आहेत. त्यातच, स्पर्धेतील भारताची ११ व्या दिवसाची सुरुवातही पदकानेच झाली. मंजू राणी आणि राम बाबू यांनी देशासाठी ७० वे पदक जिंकले. कास्य पदक मिळवत दोन्ही एथलेटसने उत्कृष्ट प्रदर्शन केले.
३५ किमी चालण्याच्या शर्यतीत मंजू राणी आणि राम बाबू यांनी सांघिक प्रकारात देशाला कास्य पदक जिंकून दिले. त्यामुळे, यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत देशासाठी हे ७० वे पदक जिंकण्यात आले आहे.