मुंबई : भारतात रॅकेट स्पोर्ट्सचा विस्ताव वाढतोय आणि रॅकेट स्पोर्ट्सवर प्रेम करणाऱ्या खेळाडूंसाठी एक आनंदाची बातमी आहे. नाटेकर स्पोर्ट्स अँड गेमिंग (NSG) आणि SETVI यांच्या संयुक्त विद्यामाने जागतिक पिकलबॉल लीग (WPBL) ही पहिली-वहिली व्यावसायिक पिकलबॉल लीग सुरू करण्यात येत आहे. NSG ही 'माजी डेव्हिस कप स्टार आणि अर्जुन पुरस्कार विजेते गौरव नाटेकर आणि त्यांची पत्नी आरती पोनप्पा नाटेकर ज्या टेनिसमधील भारताच्या माजी नंबर १ च्या खेळाडू आहेत, त्यांच्याद्वारे प्रमोट केलेली कंपनी आहे. ऑल इंडिया पिकलबॉल फेडरेशन आणि इंटरनॅशनल पिकलबॉल फेडरेशनच्या नेतृत्वाखाली आयोजित लीगमध्ये NSG कडे SETVI हे त्यांचे धोरणात्मक गुंतवणूकदार आणि भागीदार म्हणून असतील.
एक खेळाडू, सल्लागार, उद्योजक आणि प्रशासक म्हणून ३५ वर्षांपेक्षा जास्त काळाचा व्यापक अनुभव असलेले, नाटेकर स्पोर्ट्स अँड गेमिंगचे संस्थापक आणि सीईओ गौरव नाटेकर म्हणाले,"भारतातील पहिल्या जागतिक व्यावसायिक पिकलबॉल लीगचे अनावरण करताना आम्हाला अभिमान वाटतो आणि आम्ही उत्साहित आहोत. SETVI ने आमच्याबरोबर गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही नेहमीच क्रीडा संस्कृती वाढवण्याचा प्रयत्न केला आहे आणि भारतातील स्पोर्टिंग इकोसिस्टम वाढवण्याच्या संधींचा सतत शोध घेतला आहे. पिकलबॉल हे त्याच्या सहजतेचे मूर्त स्वरूप आहे. हा खेळ शिकायला सोपा आणि खेळायलाही सोपा आहे, त्यामुळे कोणत्याही वयात व कोणीही हा खेळ खेळू शकतात. त्यामुळे हा लोकांसाठी आदर्श खेळ बनतो आणि त्यामुळे खेळातील सहभागाचे लोकशाहीकरण केले जाते.
लीगच्या उद्घाटन आवृत्तीत सहा फ्रँचायझी जेतेपदासाठी स्पर्धा करतील. प्रत्येक संघात आंतरराष्ट्रीय स्टार्ससह पाच ते आठ खेळाडू असतील. या लीगमध्ये संघांना भारतीय खेळाडू आणि कनिष्ठ खेळाडू असणे अनिवार्य केले जाईल, जे जगातील सर्वोत्तम खेळाडूंकडून शिकण्यासाठी संघाचा भाग बनतील. सध्या ८० पेक्षा जास्त देशांमध्ये खेळला जाणारा, आशिया पॅसिफिक प्रदेशात पिकलबॉल अत्यंत लोकप्रिय आहे आणि गेल्या काही वर्षांत ३०,००० हून अधिक हौशी खेळाडू आणि १८ राज्यांमधील ८००० नोंदणीकृत खेळाडू हा खेळ खेळत असताना भारतात तो सातत्याने वाढत आहे. या खेळाला टेनिसपेक्षा कमी जागा आवश्यक आहे आणि तो सात ते ७० वयोगटातील कोणीही खेळू शकतो, ज्यामुळे तो जगातील अनेक भागांमध्ये सर्वात लोकप्रिय मनोरंजक तसेच स्पर्धात्मक खेळांपैकी एक आहे.