२०२३ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत अंतिम फेरीत पराभव झाल्यानंतर उत्तर कोरियाच्या क्रीडापटूंनी केलेल्या कृतीची चर्चा आता सर्वत्र होत आहे. दक्षिण कोरियाच्या संघाकडून अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर उत्तर कोरियाच्या नेमबाजांनी दक्षिण कोरियाच्या नेमबाजांसोबत एका ग्रुप फोटोमध्ये भाग घेण्यास नकार दिला. उत्तर कोरियाच्या संघाने १० मीटर रनिंग टार्गेट इव्हेंटमध्ये रौप्यपदक मिळवल्यानंतर राष्ट्रगीतावेळी विजयी देश असलेल्या दक्षिण कोरियाच्या ध्वजाकडे वळण्याच्या सर्वमान्य परंपरेचं अनुसरण करण्यास नकार दिला. एवढंच नाहीतर दक्षिण कोरियाई विजेत्यांसोबत इंडोनेशियाच्या काँस्यपदक विजेत्यानी पोडियम शेअर केले. तर उत्तर कोरियाच्या क्वोन क्वांग-इल, पाक म्योंग-वोन आणि सोंगजून यू यांनी असं करण्यास नकार दिला.
त्याचं झालं असं की, पदक वितरणावेळी दक्षिण कोरियातील एका नेमबाजाने उत्तर कोरियाच्या नेमबाजाच्या खांद्यावर हात ठेवून थाप दिली आणि बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र उत्तर कोरियाच्या खेळाडूंनी मौन बाळगले. तसेच जाणूनबुजून आपल्या शेजारी प्रतिस्पर्ध्यांसोबत कुठल्याही प्रकारचं संभाषण करणे टाळले.
पूर्व चिनी शहराच्या बाहेरील भागांमध्ये असलेल्या फूयांग यिनहू स्पोर्ट्स सेंटरमध्ये ही घटना सात्याने एका बाजूला करण्यात आलेल्या उत्तर कोरियाई संघाशी संबंधित वादांमध्ये समाविष्ट झालेली आहे.