शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

ठाण्याचा पाटील! भारताला पहिले सुवर्ण; नेमबाज रुद्रांक्षचा दिव्यांक्ष, ऐश्वर्यसह वर्ल्ड रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 7:51 AM

हांगझोउ (चीन) Asian Games2023/ Asian Games2022 : भारतीय खेळाडूंनी १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पहिल्या दिवशी ३ रौप्य व २ कांस्य अशी ५ पदकांची कमाई करून पदकतालिकेत सातवे स्थान पटकावले.

हांगझोउ (चीन) Asian Games2023/ Asian Games2022 : भारतीय खेळाडूंनी १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पहिल्या दिवशी ३ रौप्य व २ कांस्य अशी ५ पदकांची कमाई करून पदकतालिकेत सातवे स्थान पटकावले. नौकानयन स्पर्धेत अनपेक्षित दोन रौप्य व एक कांस्य, तसेच नेमबाजीमध्ये एक रौप्य आणि एक कांस्यपदकं भारतीयांनी जिंकली. सोमवारी नेमबाजीत 10m Men's Air Rifle प्रकारात भारताने सांघिक गटात सुवर्णपदक जिंकले. दिव्यांश सिंग पनवार, रुद्रांक्ष पाटील आणि ऐश्वर्य तोमर या नेमबाजांनी यांदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला  पहिले सुवर्णपदक जिंकून दिले. रुद्रांक्षने ६३२.५ गुणांसह आणि ऐश्वर्यने ६३१.६ गुणांसह वैयक्तिक गटाच्या फायनलमध्येही प्रवेश मिळवला. ( Rudrankksh at 3rd with 632.5 and Aishwary at 5th with 631.6  qualify for Final of 10m Air Rifle Individual Event.)

- नौकानयनमध्ये पुरुष सिंगल स्कलमध्ये भारताच्या बलराज पनवार याचे ७ सेकंदाच्या फरकाने कांस्यपदक हुंकले. त्याला ७:०८.७९ सेकंदाच्या वेळेसह चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. 

दिव्यांश सिंग पनवार, रुद्रांक्ष पाटील आणि ऐश्वर्य तोमर या भारतीय नेमबाजांना चीन व दक्षिण कोरियाच्या खेळाडूंकडून कडवी टक्कर मिळाली. भारतीय खेळाडूंनी पहिल्या चार फेरीत 313.7, 315.9, 313.7, 315.9 असे गुण घेत कांस्यपदकाच्या शर्यतीत स्वतःला कायम ठेवले होते. पाचव्या फेरीत 308.2 गुणांसह भारतीय नेमबाजांनी थेट सुवर्णपदकासाठी अव्वल स्थानी मुसंडी मारली. या तिघांनी चीनचा ( ३ सप्टेंबर २०१८) १८८७.४ गुणांचा आशियाई स्पर्धा विक्रमही मोडला. अखेरच्या फेरीत त्यांनी 315.8 गुण कमावले अन् चीनचा वर्ल्ड रेकॉर्डही मोडला. चीनने १९ ऑगस्ट २०२३ मध्ये बाकू येथे १८९३.३ गुणांची कमाई करून वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला होता. 

ठाण्याचा रुद्रांक्ष हा वर्ल्ड चॅम्पियन आहे. त्याने नेमबाजीचा वर्ल्ड कप जिंकला आणि डिसेंबर २०२२ मध्ये १० मीटर एअर रायफल प्रकारात अव्वल स्थान पटकावले. २०२२च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्ण जिंकून त्याने २०२४च्या पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीटही जिंकले होते.

पहिल्या दिवसाचे हायलाईट्सनौकानयन स्पर्धेच्या दुहेरी लाइटवेट स्कल्समध्ये अर्जुन लाल जाट आणि अरविंद सिंग यांनी अप्रतिम कामगिरी करत रौप्य पदकाची कमाई केली. पुरुष कॉक्स एट गटातही भारताला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. भारतीय संघात नीरज, नरेश कलवानिया, नितीश कुमार, चरणजीत सिंग, जसविंदर सिंग, पुनीत कुमार आणि आशिष यांचा समावेश होता. यानंतर कॉक्सलेस दुहेरी प्रकारात भारताला बाबूलाल यादव-लेख राम यांनी कांस्य जिंकून दिले. नेमबाजीतही भारताने दोन पदकांची कमाई केली. महिला १० मीटर एअर रायफल प्रकारात ज्युनिअर विश्वविजेती रमिताने  वैयक्तिक गटात कांस्य पदकाची कमाई केली. भारताच्या रमिता, मेहुली आणि आशी यांनी मिळून महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात रौप्य पदक जिंकले. 

टॅग्स :Asian Games 2023आशियाई स्पर्धा २०२३Shootingगोळीबारthaneठाणे