Asian Hockey Champions Trophy 2024 : भारतीयहॉकी संघ आज ८ सप्टेंबर पासून आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. भारतासह या स्पर्धेत सहा आशियाई देशांचा समावेश आहे. भारतीय संघाने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा कांस्य पदकाची कमाई केली होती. त्यामुळे भारतीय संघ यंदाच्या या स्पर्धेत प्रबळ दावेदार मानला जात आहे.
हरमनप्रीत सिंग याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ रविवारी यजमान चीन विरुद्ध मैदानात उतरेल. दुपारी या दोन संघातील सामना खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत प्रत्येक संघ एकाच राउंड-रॉबिन फॉर्मेटमध्ये एकमेकांसोबत खेळेल. यातील आघाडीचे चार संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरतील.
असं आहे या स्पर्धेच वेळापत्रक
- सकाळी ११:०० - ८ सप्टेंबर, रविवार - दक्षिण कोरिया विरुद्ध जपान
- दुपारी ०१:१५ - ८ सप्टेंबर, रविवार - मलेशिया विरुद्ध पाकिस्तान
- दुपारी ०३:३० - ८ सप्टेंबर, रविवार - भारत विरुद्ध चीन
- सकाळी ११:०० - ९ सप्टेंबर, सोमवार - दक्षिण कोरिया विरुद्ध पाकिस्तान
- दुपारी ०१:१५ - ९ सप्टेंबर , सोमवार - भारत विरुद्ध जपान
- दुपारी ०३:०० - ९ सप्टेंबर, सोमवार - चीन विरुद्ध मलेशिया
- सकाळी ११:०० - ११ सप्टेंबर, बुधवार - पाकिस्तान विरुद्ध जपान
- दुपारी ०१:१५ - ११ सप्टेंबर, बुधवार - मलेशिया विरुद्ध भारत
- दुपारी ०३:३० - ११ सप्टेंबर, बुधवार - चीन विरुद्ध दक्षिण कोरिया
- सकाळी ११:०० - १२ सप्टेंबर, गुरुवार - जपान विरुद्ध मलेशिया
- दुपारी ०१:१५ - १२ सप्टेंबर, गुरुवार - दक्षिण कोरिया विरुद्ध भारत
- दुपारी ०३:३० - १२ सप्टेंबर, गुरुवार - पाकिस्तान विरुद्ध चीन
- सकाळी ११:०० - १४ सप्टेंबर, शनिवार - मलेशिया विरुद्ध दक्षिण कोरिया
- दुपारी ०१:१५ - १४ सप्टेंबर, शनिवार - भारत विरुद्ध पाकिस्तान
- दुपारी ०३: ३० - १४ सप्टेंबर, शनिवार - जपान विरुद्द चीन
- सकाळी १०:३० - १६ सप्टेंबर, सोमवार - ५ व्या आणि ६ व्या स्थानासाठी प्ले-ऑफ
- दुपारी ०१:१० - १६ सप्टेंबर, सोमवार - पहिली सेमीफायनल
- दुपारी ०३:३० - १६ सप्टेंबर, सोमवार - दुसरी सेमीफायनल
- दुपारी ०१:०० - १७ सप्टेंबर, मंगळवार - तिसऱ्या स्थानासाठी प्ले-ऑफ
- दुपारी ०३:३० - १७ सप्टेंबर , मंगळवार - फायनल
भारतीय हॉकी चाहते या स्पर्धेतील सर्व सामने सोनी स्पोर्ट्स टेन १ या चॅनेलवर पाहू शकतात. सोनी लिव एपवरही या सामन्यांचा आनंद चाहत्यांना घेता येईल.